सिंदखेडराजा ते पाचाड जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रा रविवारी जामखेडमध्ये

0
223

जामखेड न्युज—–

सिंदखेडराजा ते पाचाड जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रा रविवारी जामखेडमध्ये

जिजाऊ स्मृती ज्योत रथयात्रा दि १४ जून ते १७ जून असे चार दिवसीय स्मृतिज्योत रथयात्रेचे नियोजन केले असून रविवार दि १५ जून रोजी रथयात्रा जामखेड शहरात येणार आहे. तरी सर्व जिजाऊ शिवभक्त समाज बांधवांनी जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज व मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ३५१ व्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा ते समाधीस्थळ पाचाड (किल्ले रायगड) येथे यदुकुलभूषण राजे लखुजीराव जाधवराव तसेच परिसरातील लखुजीराजेंच्या वंशजांच्यावतीने जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.


पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळी पुण्यतिथीच्या दिवशी सिंदखेडराजा येथील पाच विहिरींच्या जलाने जिजाऊंच्या समाधीस जलाभिषेक करण्यात येणार असून दिनांक १४ जून रोजी सकाळी ८.३०वाजता मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून रथयात्रेचे प्रस्थान होणार आहे.

दिनांक १४ जून ते १७ जून असे चार दिवसीय स्मृतिज्योत रथयात्रेचे नियोजन असून रविवार दिनांक १५ जून रोजी रथयात्रा जामखेड शहरात येणार आहे.

सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ,जामखेड यांच्यावतीने बीड रोड कॉर्नर या ठिकाणी जिजाऊ स्मृती ज्योत रथयात्रेचे पूजन व तेथून शोभायात्रेस प्रारंभ होऊन,बस स्टॅंड येथे सांगता होणार आहे.

तरी सर्व जिजाऊ शिवभक्त समाज बांधवांनी जिजाऊ रथयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज व मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here