प्रा. दादासाहेब मोहिते यांनी साकत गणातून निवडणूक लढवावी तरुणाईची मागणी

0
450

जामखेड न्युज—–

प्रा. दादासाहेब मोहिते यांनी साकत गणातून निवडणूक लढवावी तरुणाईची मागणी

उच्चशिक्षित आणि धडाडीचा नेतृत्व म्हणून प्रा. दादासाहेब मोहिते यांची ओळख

 

स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अनेकांनी निवडणूक लढवण्याचा संकल्प जरी केला असला तरी सर्वसामान्य जनता आणि तरुणाई काय म्हणते यावर सर्व अवलंबून राहणार आहे. साकत पंचायत समिती गण मधून उच्चशिक्षित आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून प्राध्यापक दादासाहेब मोहिते यांच्याकडे पाहिले जात तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांचे विश्वासू एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

यामुळे तरुणाईने त्यांना निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. त्यांचा गणात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आहे. याच बळावर गणातील तरूणांनी प्रा. मोहिते यांना पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे.

राजकीय क्षेत्रात उच्चशिक्षित धडाडीचे नेतृत्व असेल तर जनतेचे प्रश्न सहज सुटतात हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्यानं ताकत पंचायत समिती गणांमधून प्राध्यापक दादासाहेब मोहिते यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह जनतेतून होत आहे. साकत, कोल्हेवाडी, सावरगाव, मोहा, डिघोळ, जातेगाव, धामणगाव, देवदैठण, तेलंगशी इत्यादी गावातील तरुणाईने प्राध्यापक दादासाहेब मोहिते यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.

अनेक वर्ष भाजपमध्ये कार्यरत!

अनेक वर्षापासून विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे विश्वासू एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्राध्यापक दादासाहेब मोहिते यांची ओळख आहे तर हे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करत असून त्यांनी अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले आहेत.

पक्षाच्या मदतीने सर्वसामान्य जनतेच्या मदतीला थांबणारा उच्च शिक्षित तरुण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात. येणाऱ्या काळात त्यांना जर जबाबदारी दिली तर जनतेचे प्रश्न सहजासहजी सुटू शकतात अशा अपेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here