मंदोदरी (कबई) चिंतामण वराट यांच्या अल्पशा आजाराने निधन
साकत येथील मंदोदरी (कबई) चिंतामण वराट वय ८० वर्षे यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. यामुळे वराट कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कार आज रात्री 11.00 वाजता साकत येथील वराट वस्ती येथे होणार आहे.
मंदोदरी या कबई नावाने ओळखल्या जात होत्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आज साडेपाच च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पती, चार मुले ( सर्व विवाहित) , एक मुलगी (विवाहित) सुना नातवंडे असा परिवार आहे.
मंदोदरी वराट यांचे पती चिंतामण वराट हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. यांचे चारही मुले नोकरीस आहेत. तीन मुले शिक्षक तर एक मुलगा पीएमटी पुणे येथे नोकरीस आहे. आज रात्री अकरा वाजता साकत येथील वराट वस्ती येथे अंत्यविधी होईल.