मुंडे समर्थक माजी आमदार देशमुखांचं अपघाती निधन; कार अपघातात दुर्दैवी अंत
भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं अपघाती निधन झालं आहे. तुळजापूर ते औसा महामार्गावर देशमुख यांच्या कारचा अपघात झाला. लातूरमध्ये झालेल्या अपघातात देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
आर. टी. देशमुख माजलगावचे माजी आमदार होते. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक होते. पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे. मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची ओळख होती.
राज्यातील अपघातांच्या घटना वाढ झाली असून रस्ते अपघाताचे (Accident) प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने अपघाताचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. आता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल वरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली.
या अपघातात माजी आमदार (MLA) आर.टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर (Latur) येथे पाठवण्यात आले आहे. लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला आहे.
या अपघातात माजी आमदार आर.टी.देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.