जामखेड बस स्थानक समस्या बाबत पोलीस निरीक्षकांनी ठेकेदार व अधिकारी यांना फैलावर घेताच बस स्थानकात सुधारणा जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाबाबत कोणीतरी असाच पुढाकार घेण्याची गरज
जामखेड बस स्थानक समस्या बाबत पोलीस निरीक्षकांनी ठेकेदार व अधिकारी यांना फैलावर घेताच बस स्थानकात सुधारणा
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाबाबत कोणीतरी असाच पुढाकार घेण्याची गरज
शहरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड होऊन बसले आहे. त्यातच जामखेड बस स्थानकांचे काम साडेतीन वर्षांपासून संथ गतीने सुरु असून याचा फटका थेट प्रवाशांना बसला असून बस स्थानकात मोठया प्रमाणावर पाणी साचले असून याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीच पुढाकार घेऊन ठेकेदार व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले यानंतर लगेच बस स्थानक परिसरात मुरूम टाकायला सुरूवात झाली.
अडिच वर्षापासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम रखडलेले आहे. मोठ मोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत. नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. बस स्थानकाबाबत पोलीस निरीक्षक पुढे आले तसे राष्ट्रीय महामार्गाबाबत कोणीतरी अधिकारी किंवा पदाधिकारी यांनी पुढे येण्याची गरज आहे अशी चर्चा शहरात सुरू आहे.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अधिकारी व ठेकेदार यांना बस स्थानक परिसरातील प्रवाशासमोर फैलावर घेताच कामाला सुरुवात झाली. यांच्या धडाकेबाज कामगिरी मुळे यांच्या धडाकेबाज कामाचे कौतुक होत आहे.
जामखेड बस स्थानकाचे काम साडेतीन वर्षपासून सुरु असून जुन्या असलेल्या निवारा काढून टाकण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांना बाहेर उभे राहून एसटी बस ची वाट पाहावी लागत आहे याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या मात्र अद्याप पर्यंत कोणीही दाखल घेतली नाही त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी व चिखल झाला आहे.
याकडे एसटी प्रशासन व बस स्थानकाचे काम घेणारे गुरुदत्त कन्ट्रक्शन यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे बस स्थानक परिसरात चिखल व सतत पाणी साचत असल्याने प्रवाशांना चिखलात उभे राहावे लागत आहे त्यातच परिसरात स्वच्छेतेचे तीन तेरा वाजले असून मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे दरम्यान जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अचानक दुपारी १२ वाजता बस स्थानकाला भेट देऊन पाहाणी केली असता त्याचा पारा अनावर झाला.
संबंधित विभागाचा काही एक संबंध नसताना देखील सामाजिक भावनेतून त्यांनी लगेच आगार प्रमुख प्रमोद जगताप व संबंधित अधिकारी याना बोलवून प्रवाशांसमोर चांगलेच फैलावर घेतले त्यानंतर स्वतःच पुढाकार घेऊन प्रवाशांच्या अडचणी समजून घेत पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणी साचत असल्याने त्यांनी तातडीने एक हायव्हा गाडी मुरूम बोलवून मुरूम टाकून घेतला तसेच दोन दिवसात बस स्थानक परिसरात कोठेही चिखल होणार नाही यांची काळजी घेण्याची सूचना दिल्या पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या याकामामुळे प्रवाशांसह नागरिकांनी चांगले कौतुक केले