जामखेड न्युज – – – –
आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 10 ऑक्टोबरला होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
टीईटी परीक्षेचे दोन गट
साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर
प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
अर्ज कुठे करायचा?
टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरु होईल.
टीईटी परीक्षेचं वेळापत्रक
1 )ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 03/08/2021 ते 25/08/2021 वेळ 23.59 वाजेपर्यंत
2)प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. 25/09/2021 ते 10/10/2021
3)शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
4)शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30
परीक्षा शुल्क किती?
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे. तर अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.
पात्रता काय आहे?
टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे