शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी उद्या जामखेड तालुक्यात

0
557

जामखेड न्युज—–

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी उद्या जामखेड तालुक्यात

देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणारी संस्था श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी हे उद्या रविवारी तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे वारकरी भुषण पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.


भक्ती शक्ती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रकाशन व वारकरी भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यास, गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांची उपस्थिती असणार आहे.


“आम्ही वारकरी ” या ग्रंथाचे लेखक व या सोहळ्याचे संकल्पक “ह.भ.प.बळीराम दादा आळंदीकर” तसेच देव देश आणि धर्मासाठी योगदान देणारे व निस्वार्थ भावनेने सहकार्य करणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आदरणीय भिडे गुरूजींचे शिवकार्य धर्मकार्य हे अखंडपणे चालुच आहे. किल्ले दुर्गराज रायगडावर नित्य शिवछत्रपतींच्या समाधीचे धारकरी पुजन करतात. गडकोट मोहीम, दुर्गामाता दौड, श्री शिवराज्याभिषेक सोहळा,धर्मवीर बलिदान मास असे अनेक राष्ट्र हिताचे उपक्रम भिडे गुरुजींच्या प्रेरणेने महाराष्ट्रभर राबवले जातात.

आजही ९० वर्ष वय असताना तरुणांना लाजवेल असं कार्य भिडे गुरुजी करतात म्हणुनच महाराष्ट्रातील तरुणाची फौज भिडे गुरुजींच्या पाठीशी मोठ्या संख्येने आणि निस्वार्थपणे कार्य करत आहे.रविवार दि ४ मे २०२५ रोजी पाटोदा गरड येथे शिवचरित्रपर व्याखान होईल.

तरी सर्व शिवप्रेमी धारकरी बंधूनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख श्री.पांडुराजे मधुकर भोसले यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here