विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दैनिक भास्कर तर्फे पुरस्कार साकत ता. जामखेड चे सुपुत्र अनिलजी वराट व अभिजित वराट यांचा दिल्लीत होणार खास सन्मान

0
513

जामखेड न्युज—–

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दैनिक भास्कर तर्फे पुरस्कार

साकत ता. जामखेड चे सुपुत्र अनिलजी वराट व अभिजित वराट यांचा दिल्लीत होणार खास सन्मान

 

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच आपल्या व्यवसायाला प्रतिष्ठा उच्च स्थान मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा नवी दिल्ली येथे दैनिक भास्कर तर्फे खास सन्मान करण्यात येणार आहे. यात जामखेड तालुक्यातील साकत येथील अनिलजी वराट व त्यांचे सुपुत्र अभिजित वराट यांचा समावेश आहे.

अनिलजी वराट व अभिजित वराट यांनी इंदोर मध्यप्रदेश येथे धारा गृप आँफ कंपनीज मार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीज मार्फत आदर्श कार्य करत आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. 

अनिलजी वराट व अभिजित वराट यांच्या कंपन्या धारा रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रा. लि. मार्फत जमिन प्लाट ची खरेदी विक्री संबंधित सेवा दिली जाते,

सिंगनापूर धाम प्रा. लि. कलोनी संबंधित सर्व परवानगी आणणे व सेवा दिली जाते.
कायनात फार्स प्रा. लि. मार्फत होटेल व संबंधित सेवा, अभिजित बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. मार्फत बिल्डिंग, माँल, रस्ते बनविणे, धारा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. मोठ मोठ्या कंपनी मध्ये निकामी वेस्ट भंगार, जुन्या मशिनरी मॅनेजमेंट करणे अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपनी मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अनिलजी वराट यांनी रियल इस्टेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा आवार्ड देण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साकत जामखेड तसेच इंदोर येथील मित्रमंडळी नातेवाईक हितचिंतक यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

अनिलजी वराट हे मुळचे साकत ता जामखेड येथील असून ते सध्या त्यांनी इंदोर येथे धारा गृपच्या माध्यमातून आपले एक वेगळे विश्व निर्माण केले आहे.

यामुळेच भास्कर गृपने अनिलजी वराट यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याच महिन्यात नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here