राजकुमार थोरवे यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान मोठे – अरूणशेठ चिंतामणी श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक राजकुमार थोरवे यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न
राजकुमार थोरवे यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान मोठे – अरूणशेठ चिंतामणी
श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक राजकुमार थोरवे यांचा सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न
राजकुमार थोरवे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी विचार केला यामुळे आज सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्यास मोठ्या संख्येने मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित आहेत असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी यांनी व्यक्त केले.
राजकुमार थोरवे सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा श्री साकेश्वर विद्यालयात संपन्न यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती संजय वराट, डॉ भगवानराव मुरूमकर, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, हनुमंत चव्हाण चेअरमन श्री गणेश एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, गोविंदराव भोसले,प्राचार्य रमेश अडसूळ, बी. ए. पारखे, दत्तात्रय काळे, ज्ञानदेव मुरूमकर, पोलीस पोलीस, महादेव वराट, सरपंच भाऊ पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, शहादेव वराट, विठ्ठल वराट, दत्तात्रय भोसले, शत्रुघ्न भोसले, भारतकुमार भोसले, रमेश सोळंके, हरेराम जाधव, दामाजी लोमटे, बबन मेटे, संभाजी मेटे, आजीनाथ काळे, तानाजी मेटे, अभिजीत घुले, नंदुरबार देशमुख, योगेश महाले, गहिनीनाथ भोरे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, आजीनाथ भोरे, गोकुळ भोरे, साहेबराव भोरे, सुधाकर भोरे, जोतीराम बांदल, संदीप पठाडे, राजेश डिसले, सज्जन शेळके, रामेश्वर धुमाळ, दादा शेंडगे, समाधान म्हस्के, विनोद उगले, एकनाथ भोसले, हनुमंत भोसले, समाधान भोसले, हर्षद भोसले, गजानन पठाडे, वैभव कांबळे, अंबरूषी मेटे, कल्याणराव मेटे, श्रीधर सोनवणे, डॉ. सोमनाथ मेटे, अरूण थोरवे, प्रा. कुरूंद सर, प्रा. शेळके सर, रमेश नांगरे, अनिल भोरे, बंजिरंग भोरे,, नेताजी चव्हाण, संजय शेळके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट म्हणाले की, थोरवे सरांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, कोणत्याही कामास कधीही नकार दिला नाही. गावात दहा वर्षांच्या सेवेत ते गावचे कधी झाले हे कळलेच नाही.
यावेळी माजी सभापती संजय वराट म्हणाले की, थोरवे सर म्हणजे कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला शैक्षणिक बरोबरच सामाजिक बांधिलकी जपली.
डॉ भगवानराव मुरूमकर म्हणाले की, थोरवे सरांच्या दहा वर्षांच्या कालावधीत साधी एकही तक्रार गावात आली नाही ही त्यांची जमेची बाजू आहे.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर म्हणाले की, मानसाची ओळख विचार वाणी आणि कर्म यावरून ठरते, नेहमी सकारात्मक विचारामुळे मन सक्षम होते. त्यांनी समर्पित भावनेने काम केले यामुळे विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा सुधारणा झाली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राजकुमार थोरवे यांनी आपला जीवनपट तसेच शैक्षणिक सेवेतील तीस वर्षाचा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी हनुमंत चव्हाण यांनी बालपणीच्या आठवणीला उजाळा दिला तर अरूणशेठ चिंतामणी यांनी राजकुमार थोरवे यांना सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या, यावेळी लक्ष्मी वराट, विनोद उगले, पुजा थोरवे भोसले, शुभम घोडेस्वार, ज्ञानदेव मुरूमकर, प्राचार्य बी. ए. पारखे, दत्ता काळे, पी. टी गायकवाड, कैलास वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, गोविंद भोसले, संजय वराट, हनुमंत चव्हाण, श्रीराम मुरूमकर, राजकुमार थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्ता काळे तर सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी केले तरअर्जुन रासकर यांनी मानले.