जिल्हा परिषद पिंपळवाडी शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आरोही नेमाने जिल्ह्यात पहिली

0
66

जामखेड न्युज—–

जिल्हा परिषद पिंपळवाडी शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आरोही नेमाने जिल्ह्यात पहिली

 

जामखेड तालुक्यातील आदर्श व डिजिटल शाळा म्हणून ओळख असलेल्या पिंपळवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सन २०२४- २५ मध्ये मिशन आरंभ मंथन, लक्षवेध, हिंद सेवा मंडळ मध्ये विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळवले. यामध्ये राधिका बाबासाहेब घोलप हिने 300 पैकी 276 गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा व तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला.

याचबरोबर आरोही प्रकाश घोलप 300 पैकी 252 गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश झाला. समर्थ नितीन मोहिते 300 पैकी 232 , कार्तिक विष्णू नेमाने 300 पैकी 230 गुण, सार्थक बाबासाहेब घोलप 300पैकी 218 गुण, प्रकाश सोमनाथ नेमाने 300 पैकी 202 गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता दुसरीतील आरोही दादासाहेब मोहिते 150 पैकी 140 गुण मिळवत राज्यात सहावा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.

शंभूराजे शिवाजी नेमाने 300 पैकी 258 तर स्वराज जालिंदर नेमाने 300 पैकी 218 , अंजली जितेंद्र नेमाने 150 पैकी 112,अदित्य विकास टेकाळे, 150 पैकी 106 यासह अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यशस्वी व गुणवत्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्क्षक राम ढवळे व शिक्षिका जगताप वर्षा यांनी विशेष परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक, व ग्रामस्थ पिंपळवाडी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here