महिलांचे प्रशिक्षण कागदोपत्री दाखवून कोट्यवधीचा घोटाळा
जिल्ह्यातील डीआरडीए अंतर्गत आर्थिक घोटाळ्याची चौकशी करा – ॲड.डॉ.अरुण जाधव
अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत डी आर डी ए ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पंचायत समिती मार्फत प्रत्येक तालुक्यामध्ये महिला बचत गटांना वेगवेगळ्या कौशल्य व्यावसायीक प्रशिक्षण यासाठी आर्थिक मदत दिली जाते महिलांना सक्षमकरणे उद्योग उभा करून देणे ऐवजी खोटे नाटे गट उभा करून खोटे प्रशिक्षण देणे खोट्या कंपन्यांना जोडून देणे महिलाचे प्रशिक्षण न घेता चुकीचे कागदपत्र तयार करून अशा अनेक खालील कामे जिल्हापरिषद डी आर डी ए पंचायत समिती मधील कर्मचारी, गटविकास अधिकारी, खाजगी कंपन्या यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक घोटाळा 2022-23-24 या आर्थिक वर्षांमध्ये झाला आहे.
यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हापरिषद अंतर्गत डी आर डी ए यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची तात्काळ चौकशी करावी संगणक खरेदी तालुकास्तरावर समिती गठीत करून संगणक खरेदी करण्याचा निकस असताना देखील जिल्हा कक्षाला कोणतेही अधिकार नसताना देखील संगणक खरेदी करून प्रभाग क्रमांक कसे खरेदी करण्यात आले आहे.
तसेच डाटा ठराविक लोकांकडून टक्केवारी घेऊन दिले जातात,सी एस सी कडून कर्मचारी भरती करून घेत असताना त्यांच्याकडून वीस हजार रुपये घेवून पात्रतेच्या निकषात नबसणारे लोक अभियानातून जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर काम करीत आहेत,लखपती दीदीचा सर्व डाटा खोटा लखपती दीदी ॲप मध्ये महिला लखपती दाखवण्यासाठी सदरील सर्व माहिती ही बोगस भरून जास्तीत जास्त महिलांना लखोपती दाखवले गेले आहे.
लोकोस ॲप वरील गट परस्पर डिलीट करून लोकोस ॲप वरील गट ज्यांना RF मिळाला आहे असे गट mis कडून परस्पर डिलीट कसे केले गेले,जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांच्यावर बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात देखील त्यावर विशाखा समिती चौकशी का लावली जात नाही निवासी प्रशिक्षण लावून लाखो रुपयांचा अपहार महिला निवासी राहत नसल्यास तरी त्यांना निवासी दाखवून लाखो रुपये शासनाची फसवणूक करून उकलले जात आहे.
बचत गटाच्या नावाखाली खाजगी उद्योगांना हातभार गोरगरीब महिलांच्या गटांच्या नावाखाली पैसे घेऊन स्टॉल विकत दिले जातात व त्यांच्याकडून हप्ता घेतला जातो. महालक्ष्मी सरस मुंबई महालक्ष्मी सरस मुंबईला वारंवार एकच गट पाठविला जातो इतर गटांना इच्छा असताना देखील जाता येत नाही कारण त्या गरीब दुबळ्या महिला यांची अवाढव्य पैशाची मागणी पूर्ण करू शकत नाही.
वरील सर्व मुद्द्यांची महाराष्ट्र शासनाने जिल्हा कमिटी नेमून या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी व या घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी बचत गट यांच्या वरती चौकशीच्या अहवालावरून गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावे.
वरील घोटाळ्याच्या लुटा लुटीच्या मागण्यांची 1 मे 2025 पासून कारवाई न झाल्यास 5 मे 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांनी दिला आहे.
जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे आवाहन केले आहे यावेळी ॲड.डॉ.अरुण आबा जाधव, योगेश साठे,सोमनाथ भैलुमे,हनीफ शेख, ऋषिकेश गायकवाड, लेखक संतोष पवार व वंचित कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…