तहसीलदार व प्रांताधिकारी यांचा निकाल श्री साकेश्वर विश्वस्तांच्या बाजूने श्री साकेश्वर महाराज देवस्थान जमिनीच्या न्यायालयीन लढ्यासाठी सढळ हाताने मदत करावी – विश्वस्त

0
651

जामखेड न्युज—–

तहसीलदार व प्रांताधिकारी यांचा निकाल श्री साकेश्वर विश्वस्तांच्या बाजूने

श्री साकेश्वर महाराज देवस्थान जमिनीच्या न्यायालयीन लढ्यासाठी सढळ हाताने मदत करावी – विश्वस्त

पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या श्री साकेश्वर महाराज देवस्थान साकत जमिनीचा वाद कुळ कडभने व विश्वस्त ग्रामस्थ मंडळ साकत यांच्यात असून तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी विश्वस्तांच्या बाजूने निकाल दिला आहे. आता न्यायालयीन लढाई सुरू आहे तेव्हा ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करावी जेणेकरून देवस्थान ची जमीन देवस्थान ला मिळेल व यातील उत्पन्नातून देवस्थान चा विकास करता येईल.


श्री साकेश्वर महाराज साकतची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी असते. जागृत देवस्थान तसेच नवसाला पावणारे देवस्थान म्हणून परिसरात परिचित आहे. तसेच ग्रामस्थांच्या मनात देवस्थान बद्दल अढळ स्थान आहे.

श्री साकेश्वर महाराजांचे मंदिर फार पुरातन आहे. बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे संस्थापक महान संत चक्रधर स्वामी पाटोदा येथून रामेश्वर सौताडा येथे जात असताना साकत गावामध्ये थांबले होते. आजही गावात महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर आहे. तसेच त्यांच्या ग्रंथात साकत व श्री साकेश्वर महाराज मंदिराचा उल्लेख आहे.

मंदिराचा इतिहास १८६१ साली अवधूत वाहड बाबूजी, श्री भगवंत वाहड तुलबाजी व केशवराव सखाराम या तिघांनी मिळून अंदाजे ४०(चाळीस ) एकर जमीन श्री साकेश्वर महाराज देवस्थानला मा. सर जाॅर्ज क्लार्क गव्हर्नर मुंबई यांच्या हस्ते दान केली आहे.

श्री साकेश्वर महाराज साकत देवस्थानसाठी धर्मदाय आयुक्त पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन आँफिस पुणे शिवाजीनगर येथे पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० या नावाने नोंद करण्यात आली आहे. त्याचा नंबर A 506 (अहमदनगर) आहे. सुरुवातीला ट्रस्टचे विश्वस्त म्हणून स. सा. पाटील, द. बा. पाटील, सा. भ. पाटील व वा. र. कुलकर्णी होते. पुढे 1957 च्या काळात कुळ कायदा लागू झाला त्यांचे कुळ म्हणून लागलेले कडभने मंडळीची आता नियत बदलली कडभने मंडळींनी 1997- 98 पर्यंत 50 रूपये चा खंड देवाची पूजा निधी व इतर खर्चासाठी देत होते आता त्यांनी खंड देणे बंद केले आहे.


कडभने मंडळींनी कुळकायदा प्रमाणे आम्हीच मालक आहोत असे वागण्यास सुरूवात केली आहे 50 रूपये ठरल्याप्रमाणे देण्यात येणारा खंड बंद केला आहे. नंतर कडभने मंडळींनी ३२ ग कायद्याप्रमाणे जमीन विकावी असा अर्ज तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या कडे केला तसेच कोर्टामध्ये विश्वस्त व इतर काही ग्रामस्थ विरुद्ध दावा केला की, विश्वस्त व ग्रामस्थांनी आमचे पीक कापून नेले नुकसान भरपाई साठी दावे दाखल केले पुर्वीचे विश्वस्त व सध्याचे विश्वस्त यांना तहसील कार्यालय, प्रांताधिकारी व कोर्टाच्या नोटीस आल्या चालू खटले दावे विश्वस्तांनी पदरमोड करून लढवले चालवले अजुनही कोर्टात केसेस चालू आहेत.

तहसीलदार जामखेड यांनी ३२ ग कायद्याअंतर्गत जमीन कुळास विकण्याविरूध्द निकाल दिला. तेव्हा
कुळांनी प्रांताधिकारी यांच्या कडे अपील केले प्रांताधिकारी यांनीही त्यांचा दावा अर्ज फेटाळला विश्वस्त व ग्रामस्थांच्या बाजूने निकाल मागील महिन्यात मार्च 2025 मध्ये दिला आहे.

खटला केसेस लढविण्यासाठी अँड रमेश काळे, अँड बोरा वकील यांनी भरपूर सहकार्य केले आणि आणखीन करत आहेत. याबद्दल विश्वस्त व ग्रामस्थांनी दोन्ही वकिलांचे आभार मानले आहेत मोफत केस लढवली आहे.

आतापर्यंत विश्वस्तांनी पदरमोड खर्च करून खटला लढवला आहे. आता ग्रामस्थांनी देवस्थानच्या उद्धारासाठी सढळ हाताने विश्वस्त व ग्रामस्थांना सहकार्य करावे अशी अपेक्षा विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here