कावड मिरवणूक तसेच सात नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करून श्री साकेश्वर यात्रेला उत्साहात सुरूवात उद्या जंगी हगामा तर बुधवारी बैलगाडा शर्यतीचा थरार

0
563

जामखेड न्युज—–

कावड मिरवणूक तसेच सात नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करून श्री साकेश्वर यात्रेला उत्साहात सुरूवात

उद्या जंगी हगामा तर बुधवारी बैलगाडा शर्यतीचा थरार

जामखेड तालुक्यातील साकत येथे आज सोमवार सकाळी कावड मिरवणूक तसेच धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांनी सात पवित्र नद्यांचे पाणी आणून भव्य दिव्य मिरवणूक काढत देवाचा जलाभिषेक करून यात्रेला उत्साहात सुरूवात झाली. गुलालाची उधळण तसेच लेझीम व वाद्यवृंदाच्या निनादात सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. देवाचा जलाभिषेक झाला सायंकाळी पाच वाजता शेरणी वाटप व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसेच रात्री बारा वाजता देवाची पालखी छबिना निघते सर्व भाविक भक्त भक्ती भावाने दर्शन घेतात.

अनिल वराट धारा गृप आँफ कंपनी इंदोर यांनी सात नद्यांचे पाणी गंगा, यमुना, शिप्रा, नर्मदा, चंद्रभागा, गोदावरी व भीमा यांचे पवित्र जल आणून देवाचा जलाभिषेक करण्यात आला.

यात्रेनिमित्त उद्या मंगळवारी दुपारी प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख विरूद्ध राष्ट्रीय विजेता पै. निशांत कुमार यांच्यात होईल या कुस्ती साठी इनाम ३,५०,०७०( तीन लाख पन्नास हजार सत्तर रूपये) व मानाची गदा कुस्ती सौजन्य अनिलजी वराट चेअरमन धारा गृप आँफ कंपनी इंदोर प्रमुख यांनी सांगितले तर दुसऱ्या दिवशी तालुक्यात प्रथमच बैलगाडा शर्यत होणार आहे जंगी कुस्ती हगामा व बैलगाडा शर्यत थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

दि. १५ मंगळवारी सायंकाळी चार वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येते. यावर्षी प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिंकदर शेख विरूद्ध राष्ट्रीय विजेता पै. निशांत कुमार यांच्यात होईल या कुस्ती साठी इनाम ३,५०,०७०( तीन लाख पन्नास हजार सत्तर रूपये) व मानाची गदा कुस्ती सौजन्य अनिलजी वराट चेअरमन धारा गृप आँफ कंपनी इंदोर प्रमुख आकर्षण म्हणून वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेता याचबरोबर पै देवा थापा नेपाळ हे मुख्य आकर्षण असणार आहेत.

कुस्ती हगाम्यासाठी पंच म्हणून पै. बाळासाहेब आवारे, पै. बापू जरे, पै. शरद कार्ले, पै. बालाजी जरे, पै. श्रीधर मुळे, पै. विठ्ठल देवकाते, पै. वसंत रसाळ, पै. सचिन दाताळ, पै. आलेश जगदाळे, पै. भारत शिंदे, पै. मारूती गाडे, पै. मोहन पवार, पै. शकिल शेख, पै. मोहन अडसूळ, पै. सुरेश मुरूमकर, पै. डांबे मामा तर कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर टिप नवीन कुस्त्या जोडल्या जाणार नाहीत, पंचाचा निर्णय अंतिम राहिल. 

या मैदानाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, राष्ट्रीय विजेता निशांत कुमार, पै. देवा थापा यांच्या कुस्त्यांचा थरार पाहावयास मिळणार आहे. तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बाँडी बिल्डिंग विजेता २०२५ तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेता उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here