जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ व संघप्रणित मंडळाच्या वतीने संचालक संतोष राऊत यांचा विशेष सन्मान सोहळा

0
423

जामखेड न्युज—–

जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ व संघप्रणित मंडळाच्या वतीने संचालक संतोष राऊत यांचा विशेष सन्मान सोहळा

 

जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ व संघप्रणित मंडळाच्या वतीने.अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेतील सर्व सभासदांना कायम ठेवींवर सात टक्के व्याज दिल्याबद्दल शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत यांचा शिक्षक बँकेच्या जामखेड शाखेमध्ये सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

निमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संघप्रेमी शिक्षक परीवार उपस्थित होते. अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला या आर्थिक वर्षात 6.68 कोटींचा निव्वळ नफा झाला असून सभासदांच्या कायम ठेवीवर 7 टक्के प्रमाणे 14.66 कोटींचे व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आले मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी 7 टक्के कायम ठेवीवर व्याज दिले मात्र 69 लाख रक्कम यावर्षी जादा वाटली हे सर्व करत असताना मागील तरतुदी पेक्षा 2 कोटी 33 लाख रुपये कमी खर्च करून सभासद हित जोपासण्याचे काम या संचालकांनी केले अशी माहिती शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत यांनी दिली.


या आर्थिक वर्षात 1037 कोटी वरून कर्ज वितरण 1127 कोटीपर्यंत वाढले शिक्षक बँकेच्या या मागील वर्षी 1458 कोटी वरून 1533 कोटीपर्यंत ठेवी हे आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली असून तसेच खेळते भाग भांडवल 1621 कोटी वरून 1698 कोटी म्हणजेच 77 कोटींनी वाढले आहे अशी माहिती दिली.


संचालक संचालक मंडळांनी यावर्षी काटकसरीचा कारभार करून सभासद हिताला प्राधान्य दिले राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जाचे व्याजदर वाढत असताना शिक्षक बँकेने मात्र व्याजदर सातत्याने कमी केले गेल्या आर्थिक वर्षात सभासद कल्याण निधी मधून शुभमंगल भेट द्वारे व आजारी सभासदांना शिक्षक बँकेने जवळपास 40 लाखांची मदत केली आहे तसेच मयत सभासदांचे जवळपास 4 कोटींचे कर्ज बार केले आहे मागील वर्षे पेक्षा जवळपास 1.59 कोटी नफा कमी झाला असतानाही संचालकने काटकसरीचा कारभार करून व्यवस्थापन व इतर खर्चात बचत केली.


मागील वर्षीपेक्षा 60 कोटी ने कर्ज वितरण वाढले मागील सात महिन्यापूर्वी शिक्षक बँकेत झालेल्या सत्यांतरामुळे संचालक मंडळ कसा कारभार करते याकडे सभासदांचे लक्ष लागून होते व कायम ठेवीवर यावेळी कमी व्याज मिळेल असा काही विरोधी मंडळाचा कायास होता मात्र संचालक आणि राज्य उपनेते रावसाहेब रोहकले गुरुजी राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप डॉ. संजय कळमकर शिक्षक नेते रावसाहेब सुंबे साहेबराव अनाप खेमनर,राम निकम, राजू राहणे,बाबा खरात साबळे,बाळासाहेब कदम सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करून सभासदांना न्याय दिला आहे असे मत संचालक श्री संतोष राऊत सर यांनी मांडले.

या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षक नेते किसन वराट राज्य सरचिटणीस निकम , संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष नारायण राऊत ,शिक्षक नेते शिवाजी हजारे, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, मोहळकर ,नानासाहेब मोरे , विकास बगाडे ,उत्तम पवार ,यादव नाना ,मल्हारी पारखे , बहिर नवनाथ ,महेश मोरे ,बाळासाहेब जरांडे, विजय रेणुके ,अरुण मुरूमकर ,अभिमान घोडेस्वार, अतुल कोल्हे ,राम बांगर यांच्या सह अनेक शिक्षक उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here