आजच्या तरुण पिढीला संपत्तीपेक्षा संस्काराची गरज – संतोष वाळुंजकर
जामखेड येथे रामनवमी निमित्त हिंदू मेळावा संपन्न
“रामायण हा जीवनाचे आदर्श मूल्य शिकवणारा ग्रंथ आहे. श्रीराम हे आदर्श पिता, पती, पूत्र, भाऊ व राजा होते. त्यांच्या विचारांनी प्रेरित जीवन हेच खरे सार्थक जीवन आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, आजच्या तरुण पिढीला संपत्तीपेक्षा संस्कारांची गरज आहे. संस्कारांनीच देश घडतो आणि आत्मसन्मान निर्माण होतो असे मत प्रमुख वक्ते व विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सदस्य संतोषजी वाळुंजकर यांनी केले.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जामखेड यांच्या मार्फत रामनवमी निमित्त जामखेड येथील महावीर भवन येथे हिंदू मिळवायचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सदस्य राहिलेले संतोषजी वाळुंजकर हे लाभले होते.
त्यांनी रामाचे जीवन चरित्र कसे अंगीकृत करून चांगले जीवन जगावे व हिंदू धर्मासाठी काम करावे याबाबत मोलाची मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने जामखेड शहरातील हिंदू बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे प्रमुख वक्ते संतोष वाळुंजकर, विश्व हिंदू परिषद जामखेड प्रखंड मंत्री दिगंबर राळेभात, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सुनीलजी दळवी, बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा व संयोजक विवेक कुलकर्णी, तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमित चिंतामणी व उद्योगपती आकाशशेठ बाफना यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भारतीय जनता पार्टीचे डॉ. भगवान मुरूमकर, नगरसेवक पवन राळेभात, संजय (काका) काशीद व इतर अनेक मान्यवर बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना बजरंग दल संयोजक कृष्णा बुरांडे यांनी केली तसेच मान्यवरांचे स्वागत वैभव कार्ले यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार बजरंग दल सह संयोजक यादव यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी संतोषशेठ फिरोदिया यांचे विषेश सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत कराडकर, डहाळे व इतर बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर संचलन वैभव कार्ले यांनी केले.