सुनीता विल्यम्स यांचा 286 दिवसांचा चित्तथरारक प्रवास ना भात, ना चपाती काय खाल्लं?

0
1212

जामखेड न्युज——

सुनीता विल्यम्स यांचा 286 दिवसांचा चित्तथरारक प्रवास ना भात, ना चपाती काय खाल्लं?

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुमारे 286 दिवसांचा चित्तथरारक प्रवास ना भात, ना चपाती काय खाल्लं असेल याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.


सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत.


अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या.


दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले.


8 दिवसांसाठी निघालेल्या सुनीता विल्यम्स 286 दिवस अंतराळात अडकल्या होत्या. यादरम्यान अंतराळ स्टेशनवर प्रत्येक अंतराळवीराला दररोज जवळपास 1.72 किलो अन्न पुरवलं जातं.

अंतराळवीरांचं अन्न फ्रीज, ड्राय किंवा पॅक केलेलं असतं. मांसाहारी पदार्थ आणि अंडी पृथ्वीवर शिजवली जातात आणि पॅक केली जातात. अंतराळात ती फक्त गरम करण्यात येतात.
अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीर पावडर दूध, धान्य, रोस्ट चिकन, पिझ्झा असे पदार्थ खातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here