Friday, September 4, 2026
Home ताज्या बातम्या आम्ही आधी शिवसैनिक, मग मंत्री, राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात...

आम्ही आधी शिवसैनिक, मग मंत्री, राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात – शंभूराज देसाई

0
331
आम्ही आधी शिवसैनिक, मग मंत्री, राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात – शंभूराज देसाई
जामखेड न्युज – – – 
केंद्रिय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्वध ठाकरे यांच्यावर जी एकेरी भाषेत टीका करत आहेत त्याला जसेच्या तसे उत्तर देण्याची आणि नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकामध्ये असल्याचा इशारा गृहराज्मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. पक्षाने सांगितले आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितले तर जशास तसे उत्तर देवू. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
     नारायण राणे हे शिवसेनेमुळे मोठे झाले आणी आता शिवसेनेवरच टिका करत आहेत तेही पातळी सोडून प्रत्येक शिवसैनिक त्यांना जशास तसे उत्तर देवू शकतो. सध्या नारायण राणे यांच्या असंस्कृत पणाचे दर्शन महाराष्ट्र
पहात आहे. शिवसैनिकांनी ठरवले तर त्यांना पळता भुई थोडी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!