Monday, October 26, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये आगीचा तांडव! न्यू आनंद कुशन वर्क्सला भीषण आग, १ कोटी ३०...

जामखेडमध्ये आगीचा तांडव! न्यू आनंद कुशन वर्क्सला भीषण आग, १ कोटी ३० लाखांचे नुकसान! नगर रोडवरील दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी, फर्निचर, कच्चा माल, मशिनरीसह शेड जळून खाक

0
20
जामखेडमध्ये आगीचा तांडव! न्यू आनंद कुशन वर्क्सला भीषण आग, १ कोटी ३० लाखांचे नुकसान!  नगर रोडवरील दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी, फर्निचर, कच्चा माल, मशिनरीसह शेड जळून खाक

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये आगीचा तांडव! न्यू आनंद कुशन वर्क्सला भीषण आग, १ कोटी ३० लाखांचे नुकसान!

नगर रोडवरील दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी, फर्निचर, कच्चा माल, मशिनरीसह शेड जळून खाक

जामखेड शहरातील नगर रोडवरील श्री न्यू आनंद कुशन वर्क्स या दुकानाला रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९.५१ वाजता भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर, कच्चा माल, मशिनरी, इलेक्ट्रिक साहित्य आणि शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीचा अंदाज तब्बल १ कोटी ३० लाख रुपये असल्याची नोंद जामखेड पोलिसांच्या जनरल डायरीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्हाला शासनाकडून व विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुराणा यांनी केली आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला महावीर खुशालचंद सुराणा रा जामखेड वय ३२ यांनी खबर देत म्हटले आहे की, रविवार दि. २५ रोजी सायंकाळी ९.५१ च्या आसपास श्री न्यू आनंद कुशन वर्क्स हे दुकान नगर रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोरील दुकानातील सर्व वस्तू आगीत जळून भस्मसात झाल्या यात सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दुकानाच्या शेजारी डी के ग्राफिक्स
दिपक विनायक कंकसकर यांच्या दुकानातील मशनरी, वायरिंग, प्लास्टिक वस्तू व राॅ मटेरियल चेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुकानात कुशन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, फोम, फर्निचर, प्लास्टिकच्या वस्तू, विविध मशिनरी आणि इतर साहित्य होते. आगीमुळे या साहित्याचे मोठे नुकसान झाले.

नुकसानीचा तपशील
पोलिसांच्या जनरल डायरीतील नोंदीनुसार, नुकसानीचा अंदाज पुढीलप्रमाणे
दुकानातील साहित्य व कच्चा माल : ६५ लाख रुपये
दुकानाचे शेड : २० लाख रुपये
फर्निचर व कटिंग साहित्य : ३० लाख रुपये
तयार सोफे व पडदे : १० लाख रुपये
कॉम्प्रेसर, शिलाई मशीन, जनरेटर व इतर साहित्य : ५ लाख रुपये
एकूण अंदाजित नुकसान : १ कोटी ३० लाख रुपये.

 

आगीचे कारण अस्पष्ट पोलिसांत नोंद
या आगीची नोंद जामखेड पोलीस ठाण्यात जनरल डायरी क्रमांक ०२१ अन्वये सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी  करण्यात आली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नोंदीत आगीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील नमूद आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.


नगर रोडवरील या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे कारण स्पष्ट होऊन नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन झाल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!