Home ताज्या बातम्या गोरगरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, धनदांडग्यांना अभय? पुन्हा मोजणीच्या नावाखाली पळवाट? जामखेडची अतिक्रमण...

गोरगरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, धनदांडग्यांना अभय? पुन्हा मोजणीच्या नावाखाली पळवाट? जामखेडची अतिक्रमण हटाव मोहीम संशयाच्या भोवऱ्यात, सुनील जगताप यांचा प्रशासनाला सवाल!

0
3
गोरगरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, धनदांडग्यांना अभय? पुन्हा मोजणीच्या नावाखाली पळवाट?  जामखेडची अतिक्रमण हटाव मोहीम संशयाच्या भोवऱ्यात, सुनील जगताप यांचा प्रशासनाला सवाल!

जामखेड न्युज – – – – 

गोरगरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, धनदांडग्यांना अभय? पुन्हा मोजणीच्या नावाखाली पळवाट?

जामखेडची अतिक्रमण हटाव मोहीम संशयाच्या भोवऱ्यात, सुनील जगताप यांचा प्रशासनाला सवाल!

जामखेड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले असताना, वाहतुकीची खरी समस्या असलेल्या खर्डा चौक ते जयहिंद चौक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही? असा सवाल सुनील जगताप यांनी उपस्थित केला आहे.

 

शहरात वाहतुकीची मोठी समस्या नसलेल्या ठिकाणी गोरगरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर चालविला जातो; मात्र जिथे वाहतूक कोंडी होते, तिथे कारवाई करताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद का ठरते? टपरीधारकांना वेगळा न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल जगताप यांनी केला.

महाराष्ट्रातील अनेक शहरांत अतिक्रमणे हटविली जात असताना जामखेडमध्येच अडचण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अतिक्रमणांचा प्रश्न कायम, पाणीपुरवठा योजना रखडलेली आणि विकास निधीचा प्रश्न प्रलंबित असल्याने शहराच्या विकासाला खीळ बसत असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव न करता समान निकषांनुसार कारवाई करावी, महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लावावे आणि शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सुनील जगताप यांनी केली आहे.

टपरीधारकांना वेगळा न्याय, धनदांडग्यांना वेगळा का?

अतिक्रमण हटाव मोहिमेत सर्वांसाठी समान नियम लागू असणे अपेक्षित आहे. मात्र, गोरगरिबांच्या व्यवसायांवर तातडीने कारवाई होत असताना प्रभावशाली आणि धनदांडग्या व्यक्तींच्या अतिक्रमणांबाबत प्रशासन मवाळ भूमिका का घेत आहे, असा सवाल सुनील जगताप यांनी उपस्थित केला.
‘गोरगरिबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर चालविण्यासाठी प्रशासन तत्पर असते; मग जिथे खरोखर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते, तिथे कारवाई करताना प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविताना कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. नियम सर्वांसाठी सारखे असतील, तर कारवाईही समान पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय महामार्गाचे काम तीन वर्षांपासून रखडलेच!
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. या कामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
मात्र, महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर ठोस आणि सर्वसमावेशक निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महामार्गाची हद्द निश्चित करून, संबंधित अतिक्रमणांबाबत स्पष्ट भूमिका घेऊन आणि सर्वांना समान निकष लावून कारवाई केल्यास रखडलेल्या कामाला गती मिळू शकते, असे मत व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात अतिक्रमणे हटतात, मग जामखेडमध्येच अडचण काय?
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमा राबविल्या जात असताना जामखेडमध्येच अतिक्रमणांचा प्रश्न का सुटत नाही, असा सवालही सुनील जगताप यांनी उपस्थित केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!