जामखेड न्युज ——
नाहुली सेवा संस्थेच्या निवडणूकीला हिंसक वळण
विजयी उमेदवार पुत्रावर भ्याड हल्ला
हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा – संतोष गव्हाळे
जामखेड तालुक्यातील नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवातीला नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या तसेच विरोधकाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने दहावी जागाही आली राहिलेल्या तीन जागेसाठी निवडणुक झाली काल झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने तीनही उमेदवार विजयी झाले यामुळे एकुण तेरा च्या तेरा जागांवर विजय मिळवला.
विजयानंतर एकच गोंधळ झाला यात बाळासाहेब नामदेव खवळे यांच्या वर भ्याड हल्ला झाला यात ते जखमी झाले खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ला करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा युवा नेते संतोष गव्हाळे यांनी केली आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली दिग्गजांचा पराभव केला कार्यकर्त्यांकडुन झालेला पराभव दिग्गजांच्या जिव्हारी लागला यामुळे आमच्या उमेद्वारावर जीवघेणा हल्ला झाला असे सांगण्यात आले आहे.
अनुसूचित जाती जमातीचे विजयी उमेदवार नामदेव नाना खवळे यांच्या मुलगा बाळासाहेब खवले यांना मारहाण करण्यात आली. यामुळे जामखेड तालुक्यातील वातावरण संवेदनशील झाले आहे.
नाहुली सोसायटीच्या पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल करून निवडणुक लढलेले कार्यकर्ते मार्केट कमिटी संचालक सचिन घुमरे आणि मार्केट कमिटी माजी संचालक काकासाहेब गर्जे यांनी दिग्गजांना धुळ चारत निवडणुकीत १३-० ने यश मिळवलं
हा पराभव सहन न झाल्याने विरोधकांकडून
विजयी उमेदवार पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला लोकशाहीला काळीमा फासवुन बाळासाहेब नामदेव खवळे
यांच्यावर भ्याड हल्ला करणारांचा जाहीर निषेध करण्यात आला. नाहूली येथे नाहूली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादामध्ये विजयी उमेदवार पुत्राला मारहाण करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपाचे युवा नेते संतोष गव्हाळे यांनी केली आहे.