रयत सेवक तर्फे कला शिक्षक मयुर भोसले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
270

जामखेड न्युज——

रयत सेवक तर्फे कला शिक्षक मयुर भोसले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

जामखेड येथील नागेश विद्यालयाचे कला शिक्षक मयुर भोसले यांनी मानवीसाखळी व्दारे तयार प्रजासत्ताक दिन या नावाचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तर 2024 मध्ये मानवी रचनेतील भारताचा नकाशाची अशिया बुक मध्ये नोंद झाली तसेच प्रजासत्ताक 2025 रोजी “२६ जानेवारी” हे नाव वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र होऊन रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाचे देशपातळीवर घेऊन गेल्याबद्दल रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक सातारा- तर्फे कलाशिक्षक मयुर भोसले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक सातारा शाखा कर्जत ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्षेत्रातील २०२४-२५ चा गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ कर्जत येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत सेवक बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड ,प्रमुख उपस्थिती र.शि.सं.जनरल बॉडी सदस्य व जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र (तात्या) फाळके ,विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, माजी साह्य.विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर, प्राचार्य संजय नगरकर,नगराध्यक्ष उषाताई राऊत, दीपक भोये,शहाजी मकरे, राजेंद्र खेडकर, प्राचार्य राजकुमार चौरे, राजकुमार शेलार , प्राचार्य सुरेश भोईटे, प्रमोद परदेशी, भागवत यादव, अशोक झरेकर, दीपक भोये,श्रीराम केदार, बापूसाहेब काळे,शाखाधिकारी युवराज भुजबळ,संचालक दिपक तुपे ,शामराव भोये ,अशोक रणखांब, बाळासाहेब येवले, शिंदे बी एस आदी मान्यवर उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे नाव आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड च्या माध्यमातून जागतिक पातळीवर चमकवल्याबद्दल रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक सातारा शाखा कर्जत यांच्या वतीने कला शिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार रोहित पवार, नागेश कन्या स्कूल कमिटी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस राजेंद्र कोठारी , हरिभाऊ बेलेकर , प्रा मधुकर राळेभात, ,सुरेश भोसले,प्रकाश सदाफुले, विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापक संजय हजारे, पर्यवेक्षक विकास कोकाटे नागेश कन्या विद्यालय सर्व शिक्षक पालक ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here