जामखेड शहरात पाणीबाणी, दहा दिवस झाले तरी अनेक भागात पाणी नाही, जामखेड करांना उजणीच्या पाण्याची प्रतिक्षा

0
466

जामखेड न्युज—-

जामखेड शहरात पाणीबाणी, दहा दिवस झाले तरी अनेक भागात पाणी नाही, जामखेड करांना उजणीच्या पाण्याची प्रतिक्षा

 

जामखेड शहराला सध्या भुतवडा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. सरासरी आठ दिवसातून एकदा पाणी होत आहे. सध्या धरणातही चांगला पाणीसाठा आहे तरीही शहरातील शिवाजीनगर संभाजीनगर मार्केट व मराठी शाळेमागे दहा दिवस झाले तरी पाणी नाही यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उजणी धरणातून कधी पाणी योजना पुर्ण होते व दररोज पाणी मिळते याची प्रतिक्षा जामखेड वासियांना लागली आहे सध्या तरी शहरात पाणीबाणी सुरू आहे.

एकेकाळी चौवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून जामखेड ची ओळख होती. यामुळे शहराचा विस्तार वाढत गेला. सध्या जामखेड शहराला आठ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. पण काही भागात दहा दिवस झाले तरी पाणी सुटलेले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी
तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. हीच मागणी लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी दहिगाव (उजनी ) येथून ६४ किमी लांब आसलेली १७९. ९८ कोटी रुपयांची महाराष्ट्र सुवर्णजयंती नगोत्थान महाअभियाना अंतर्गत ही पाणीपुरवठा योजना मंजूर दिली होती. मात्र नंतर हीयोजना अडगळीत पडल्यासारखी झाली होती. यानंतर आमदार रोहित पवार यांनी या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारित तांत्रिकमान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली.


दहिगाव ते जामखेड ६४ किमीची योजना करमाळा तालुक्यातील दहिगाव ते जामखेड अशी ६४ किमी अंतर असलेली ही पाणीपुरवठा योजना आहे. दहिगाव येथील उजनी बॅकवॉटर मधून ३५० एच.पी मोटारने पाणी उपसा करून करमाळा या ठिकाणी आणण्यात येणार आहे. करमाळा येथन जवळा नान्नज मार्गे ग्रॅव्हिटीने हे पाणी जामखेड जवळील चुंबळी या ठिकाणी बंद पाईपलाईन द्वारे आणण्यात येणार आहे. यानंतर चुंबळी या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र तयार करून नंतर पुढे पाईपलाईन द्वारे शहरात व उपनगरात अंडरग्राउंड नवीन पाईपलाईन टाकून नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

श्रेयवाद उफाळू येणार !

जामखेड शहरातील पाणीपुरवठा योजना सह इतर अनेक कामामाध्ये श्रेयवाद उफाळून येत आहे. आम्हीच मंजुरी आणली आम्हीच निधी आणला पण आता सव्वा वर्षापासून सुरू केलेली पाणीपुरवठा योजना लवकरात सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून मार्गी लावावी म्हणजे शहरवासीयांना दररोज पाणी मिळेल.

चौकट
जामखेड शहरासाठी उजणी धरणातून पाणीपुरवठा योजना डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाली होती मे. इगल इन्फ्रा इंडिया ठाणे यांनी काम घेतलेले आहे. दोन वर्षाची काम पूर्ण करण्याची कालमर्यादा आहे. सध्या 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण बील मात्र फक्त 25 ते 30 टक्केच मिळाले आहे. मिळालेल्या बीलापेक्षा खुपच जास्त काम केले आहे. लवकर बील मिळाल्यास लवकर काम पूर्ण होईल तसेच शहरात राष्ट्रीय महामार्ग गटाराबाहेर नगरपरिषदेचे पाईपलाईन साठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणजे काम करता येईल.

मौनेश गुरूबक्ष (मे. इगल इन्फ्रा इंडिया)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here