जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत तीन दिवस विविध कार्यक्रम रक्तदान शिबीर, सांस्कृतिक नाट्यछटा, भव्य मिरवणूक, पुरस्कार वितरण व शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
जामखेड महिला आयोजित शिवजन्मोत्सव समिती मार्फत तीन दिवस विविध कार्यक्रम
रक्तदान शिबीर, सांस्कृतिक नाट्यछटा, भव्य मिरवणूक, पुरस्कार वितरण व शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
आरोग्य बिघडून टाकणाऱ्या मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात शरीर कमावून देणारे मर्दानी खेळ जसे दुर्लक्षित होते गेले. तसेच युध्दकला आणि शस्त्रांशी असलेले नातेही पुसट होत गेले. हेच नाते घट्ट कऱण्यासाठी जामखेड येथे महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, माता भगिनी यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच महिला शिवजन्मोत्सव समिती रोहिणीताई संजय काशिद यांनी स्थापन करून गेल्या तेरा वर्षापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षीही तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
१६ मार्च रोजी सकाळी आठ वाजता रक्तदान शिबीर सायंकाळी सात वाजता तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा
१७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता भव्य महिला रँली छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड बीड रोड, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, लक्ष्मीआई चौक सायंकाळी सात वाजता शिवरायांनी महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा. शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद १८ मार्च रोजी भव्य शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत
भव्य मिरवणूकीत ऐतिहासिक, पारंपरिक वेशभूषा असणाऱ्या तीन महिलांना लकी ड्राँ मार्फत तीन आकर्षक भेट वस्तू मिळतील स्थळ लक्ष्मीआई चौक संविधान चौक जामखेड
जगदंबा प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच जामखेड तसेच संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी काशिद या गेल्या तेरा वर्षापासून सर्व महिलांना घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करतात. यात रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच परिसरातील विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, महिलांची भव्य दिव्य मिरवणूक अशा पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यात परिसरातील सामान्यातून असामान्य कर्तृत्व निर्माण करणाऱ्या मान्यवर यांना जामखेड भूषण व जामखेड गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
१६ मार्च रोजी सकाळी आठ वाजता रक्तदान शिबीर सायंकाळी सात वाजता तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यात मोठा गट प्रथम क्रमांकास १११११ रूपये द्वितीय क्रमांकास ७७७७ रूपये, तृतीय क्रमांकासाठी ५१११ रूपये तर लहान गटात प्रथम क्रमांकासाठी ८१११, द्वितीय क्रमांकासाठी ५१११ तर तृतीय क्रमांकासाठी ३५११ असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
नाट्यछटा विषय- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग, ऐतिहासिक नाट्य प्रसंग, महाराष्ट्राची संत परंपरा, सामुदायिक नृत्य ऐतिहासिक व पौराणिक
स्पर्धेचे नियम व अटी नाट्यछटा ही अनेक पात्रांची असावी एकपात्री नसावी, स्पर्धेसाठी पाच ते दहा मिनिटांचा वेळ असेल, लहान गट पहिली ते सहावी मोठा गट सातवी ते बारावी, वेशभूषा व नेपथ्य यासाठी गुणदान असेल.
काय असणार शिवकालीन शस्त्रप्रदर्शनात
तलवारींचे विविध प्रकार, कुंत, दांडपट्टा, जंबिया, वाघनख, खंजीर, चिलखत, तोफगोळे, तेगा, दस्तान, अंकुश, जुल्फिकार, वीटा मराठा धोप, , गेंड्याच्या कातडीची ढाल, कासवाची ढाल, अडकित्याचे असंख्य प्रकार, राजाराणी खंजीर, त्रिमुखी खंजीर चंद्रभान, कट्यारी, हस्तीदंताचे खंजीर, चिलखते, कुऱ्हाडी बंदू, माडू अशा असंख्य प्रकारांची शस्त्रे पाहण्याची सुवर्ण संधी आपणास रोहिणीताई संजय काशिद आयोजक महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड यांनी उपलब्ध करून दिली आहे तरी परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, माता भगिनी यांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.