संभाजी महाराजांचे चरित्र प्रेरणादायी – प्रा सचिन गायवळ समाजसेवक निलेश गायवळ व महेश निमोणकर यांच्या मोफत छावा चित्रपट दाखवण्याच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल विशेष आभार

0
429

जामखेड न्युज——

संभाजी महाराजांचे चरित्र प्रेरणादायी – प्रा सचिन गायवळ

समाजसेवक निलेश गायवळ व महेश निमोणकर यांच्या मोफत छावा चित्रपट दाखवण्याच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल विशेष आभार

संभाजीराजे आपल्या 9 वर्षाच्या कारकीर्दीत 125 यशस्वी लढाया लढले, या काळात ते एक कुटुंबप्रमुख म्हणून, पती म्हणून, पिता म्हणून, मुलगा म्हणून, राजा म्हणून कसे होते हे छावा चित्रपटात खूप सुंदरपणे दाखवले. संभाजी महाराजांचं चरित्र महिला व युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे असे मत प्रा सचिन गायवळ यांनी व्यक्त केले.


जामखेड येथील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहात जागतीक महिला दिनानिमित्त शनिवार दि. ८ मार्च ते 10 मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या जिवनावरील आधारीत “छावा” चित्रपट सलग तीन दिवस दोन शो दाखवण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी घेतलेला आहे. आज दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते शोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी समाजसेवक प्रा. सचिन गायवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रमुख पांडुरंग भोसले, शिवसेना शहर प्रमुख गणेश काळे, अवधूत पवार, चित्रपट गृहाचे मालक विनायक राऊत, सुरज काळे, गणेश डोंगरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांनी चित्रपट गृह खचाखच भरले होते.

यावेळी बोलताना प्रा. सचिन गायवळ यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच महिला साठी मोफत चित्रपट या स्तुत्य उपक्रमाबद्दल सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ व महेश निमोणकर यांचे विशेष आभार मानले.

यावेळी बोलताना पांडुरंग भोसले म्हणाले की, संभाजी महाराज यांचे काम देश व धर्म हिताचे होते.औरंगजेब हा चोर होता. औरंगजेबाचे गोडवे गाणारे काही अपप्रवृत्ती आजही आपल्या राज्यात आहेत सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे.

चित्रपट गृहाचे मालक विनायक राऊत म्हणाले की, राष्ट्रपुरुषांचे विचार समाज्यात रूजणे महत्त्वाचे आहे. यासाठी छावा हा चित्रपट आहे. निलेश (भाऊ) गायवळ व महेश निमोणकर यांचे विशेष आभार

यावेळी महिला प्रतिनिधी म्हणून प्रिया थोरात यांनी महिलांना आवाहन केले की प्रत्येक मातेने आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावेत, चित्रपट गृह खचाखच भरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here