उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राजुरी च्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांचा बारामती येथे खास सन्मान
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले काम केल्याबद्दल राजुरीच्या विद्यमान सरपंच सौ अश्विनीताई सागर कोल्हे यांचा कृषी विज्ञान केंद्र बारामती व शारदा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला, सरपंच पदाच्या कार्यकाळात राजुरी मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. याबद्दल सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
त्याबद्दल सौ सूनंदाताई राजुरीच्या विद्यमान सरपंच अश्विनीताई कोल्हे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिलांना हा पुरस्कार दिला जातो. राजुरीच्या विद्यमान सरपंच अश्विनी ताईंचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
अश्विनी कोल्हे यांची डिसेंबर 2022 मध्ये जनतेतून बहुमताने सरपंच म्हणून निवड झाली होती. आपल्या सरपंच पदाच्या काळात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी विषयक कामात आपला ठसा उमटवला, परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले यातून विद्यार्थ्यांचा चांगला शैक्षणिक विकास घडवून आला आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस उपलब्ध व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा करत बस प्रशासनास वेळेवर बसचे नियोजन करण्यास भाग पाडले.
गावात सुयोग्य जलजीवनची कामे केल्यामुळे गावातील नागरीकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला. असे विविध सामाजिक उपक्रम राबविले.
महिला दिनाचे औचित्य साधत अश्विनी सागर कोल्हे यांच्या याच उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल बारामती कृषी विज्ञान केंद्र व शारदा महिला संघयांनी दखल घेऊन त्यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.