खर्डा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी आतंरजिल्हा दरोडेखोरांची टोळी जेरबंद, 9,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

0
1269

जामखेड न्युज——–

खर्डा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
आतंरजिल्हा दरोडेखोरांची टोळी जेरबंद,

9,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

मागील महिन्यात तालुक्यातील दिघोळ येथे
सोलर पावर प्लांटवर वॅाचमनचे हातपाय बांधुन दरोडा टाकणारी आतंरजिल्हा टोळी खर्डा पोलीस स्टेशन कडुन जेरबंद करण्यात आली आहे या टोळीकडून एकुण 9,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या धडाकेबाज कामगिरी मुळे खर्डा पोलिसांचे कौतुक होत आहे.


प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक. 17/02/2025 रोजी पहाटे 3/30 वा सुमारास O2 पाँवर प्रा.लि.या सोलर कंपनीमध्ये दिघोळ फाटा ता जामखेड जि अहिल्यानगर या कंपनीमध्ये सिक्युरीटी गार्ड ड्युटीवर असताना अज्ञात 5 ते 6 चोरटे सदर ठिकाणी आले व फिर्यादी व साक्षीदार हे बसलेल्या ठिकाणी पाठीमागुन येवुन लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने मारहाण करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे हातपाय बांधुन खिशामधील मोबाईल काढुन फेकुन दिले व एकाने पिकअप गाडी बोलावुन घेवून 6,75,000=00 रूपये किंमतीची विंध्य टेलीलिंक्स कंपनीची 1C 6 SQMM Copper DC Cable अंदाजे 27000 हजार मीटर लांबीची एकुण27 ड्रम (रोल) 25 रूपये मिटर प्रमाणे किं.अं. माल जबरी चोरी करुन घेवून गेले आहेत.वैगरी मजकुर वरुन फिर्याद दाखल करण्यात आलेली होती सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत होते.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना मा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला ,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शखाली दोन पथक तयार करुन सदर पथकाने घटनास्थळ ते अहिल्यानगर पर्यंतचे वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज चेक करुन सदर गुन्हायातील वापरलेले वाहन पिकअप नं MH48 CB 2458 निष्पन्न झल्याने सदर वाहण व चालक आरोपी अनिलकुमार रामावत प्रजापती वय 30 वर्षे,रा..एकमा, पोस्ट- गंगावली ता.खलीलाबाद जिल्हा-संतकबीरनगर, उत्तर प्रदेश ह.रा.खाडी नंबर-3, 90 फुट रोड, एल.बी.एस. नगर, साकीनाका, मुंबई उपनगर यास साकीनाका येथुन ताब्यात घेण्यात आले.

दिनांक 28/02/2025 रोजी 11/00 वा च्या सुमारास पोकाँ/ विष्णु आवारे यांना गुप्त बातमीदारा मार्फत सदर गुन्हयातील आरोपी हे चोरी करण्याच्या उद्देशाने धानोरा शिवार ता. आष्टी जि बीड रोडने जामखेड चे दिशेने येत आहेत, अशी माहिती मिळाल्याने तात्काळ खर्डा पो स्टे व जामखेड पो स्टे असे संयुक्तिक पथक तयार करून स्थानिक नागरिकांचे मदतीने एकूण 05 जण दि. 28/02/25 रोजी 23.30 वा. सुमारास ताब्यात घेतले आहे.

आरोपी नामे –
1.सागर गोरक्ष मांजरे रा. अहिल्यानगर
2.वाहिद काहीद खान रा. आंबावली,ठाणे 3.सिराज मियाज अहमद रा. आंबवली,ठाणे व 01 विधिसंघर्षित बालक रा. आंबीवली, ठाणे यांना निष्पन्न करून यातील 03 आरोपीस अटक करण्यात आली असून 01 विधिसंघर्षित बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे.

दाखल गुन्हायातील आरोपी कडुण ईतर 02 आरोपी निषपन्न करण्यात आले असुन त्यांच्या नावे 1) अमोल चांदणे रा अहिल्यानगर 2) बद्री आलम रा.अबोवली ठाणे.3) वाहीद (पुर्ण नाव माहीत नाही ) असे आहेत.आरोपी सागर मांजरे हा सराईत गुन्हेगार असुन त्यावर अहिल्यानगर जिल्हामध्ये एकुण 28 गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीतांकडुन दरोड्यातील चोरी गेलेला माल व एक पिकअप टेम्पो असा एकुण 9,25,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सापळा कारवाई मघ्ये त्यांच्याजकडून 02 कोयते, 05 स्टीलचे पान्हे, 01 लोखडी पक्कड, 01 एक्स पान्हा व त्याचे 04 ब्लेड व 04 मोबाईल असे दरोड्याचे साहित्य मिळून आल्याने ते पंचनामा्याने जप्त करण्यात आले आहे.

सदर ची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला ,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांच्या मार्गदशनाखाली खर्डा पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विजय झंजाड पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, विष्णु आवारे, शशी म्हस्के, पंडित हंबर्डे,बाळु खाडे, गणेश बडे, धनराज बिराजदार,व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार विश्वास बेरड,रोहीत मिसाळ,अतुल लोटके यांनी केले असुन आरोपी सापळा कारवाई साठी जामखेड पोलीस स्टेशन सपोनि श्री.नंदकुमार सोनवलकर,पोलीस अंमलदार प्रविण इंगळे, देवा पळसे, कुंदन घोळवे,चालक हनुमंत आडसुळ यांनी मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here