नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या पॅनलच्या नऊ जागा बिनविरोध जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना धक्का

0
1405

जामखेड न्युज——

नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या पॅनलच्या नऊ जागा बिनविरोध

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना धक्का

नाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये सभापती राम शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ जागा बिनविरोध आल्या आहेत. अमोल राळेभात यांच्या पॅनलच्या नऊ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. यामुळे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची विजय घोडदौड सुरू झाली आहे.

आज छाननी झाली यात नऊ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत यामुळे नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या राहिलेल्या जागेसाठी १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

संस्थेच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 33 अर्ज भरलेले असताना सहकार महर्षी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांची सर्व यंत्रणा भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस व विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या विरोधात उभी असताना देखील अमोल राळेभात यांच्या पॅनलचे नऊ अर्ज छाननी मध्ये बाद होऊन सचिन (नाना) घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या पॅनलच्या नऊ जागा बिनविरोध निवडून येत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांना मोठा धक्का दिला आहे.

नाहूली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक सचिन (नाना) घुमरे व काकासाहेब गर्जे यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे. नितीन घुमरे, मगन बहिर, बाबुराव बहिर, प्रभाकर बहिर, संदिपान बहिर, दीपक बहिर, अशोक जाधव, राजेंद्र जाधव, बाळासाहेब बहिर.

बाहुली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीवरूनच लक्षात येत आहे की येणारी अ.नगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीचे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here