सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर गोशाळेतील गायांना हिरवा चारा वाटप तसेच मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन कोठारी प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
जामखेड जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड, इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सर्व आजारावर तपासणी शिबिर,अस्थिविकार तपासणी मोफत होणार आहे आणि लागणारे औषध मोफत (उपलब्धतेनुसार)दिले जाणार आहे. डॉ. दानिश शहा एम.बी.बी.एस. ऑर्थो सर्जन, डॉ. दिलीप जोंधळे,डॉ. भरत दारकुंडे, डॉ. सोनाली दारकुंडे , डॉक्टर वसुधा जोंधळे एमबीबीएस मेडिकल कॉलेज डायरेक्टर जनरल फिजिशन, डॉक्टर स्वाती देशमुख मैड एम बी बी एस डी एन बी ओ बी जी वाय श्री रोग तज्ञ, डॉक्टर प्राची जोंधळे बी ए एम एस जनरल फिजिशन,रूग्णांची तपासणी करणार असून, त्यांच्याबरोबर हॉस्पिटल मधील अन्य तज्ञ डॉक्टर रूग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात बी. एम. डी. (हाडाची ठिसुळता ) मोफत तपासणी करून,रूग्णांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय लालचंद सुराणा सदस्य अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई , तर प्रमुख अतिथी प्रेमराजजी बोथरा अध्यक्ष बडी साजन श्री संघ अहिल्यानगर (चेअरमन पारस ग्रुप) तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री अशोकजी मुराई रिटायर डेप्युटी कलेक्टर इन्कम टॅक्स व डॉ. शोभाताई आरोळे संचालक आरोळे हॉस्पिटल जामखेड यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री बडीसाजन ओसवाल श्रीसंघाचे सेक्रेटरी विशाल शेठीया ,सारडा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, गणेश लकारे केंद्रीय गृह मंत्रालय अधिकारी अहिल्यानगर, गणेश माळी तहसीलदार जामखेड, डॉ.विशाल हरकर कडा, महेश पाटील पोलीस निरीक्षक जामखेड, शुभम जाधव गटविकास अधिकारी जामखेड, डॉक्टर दिलीप जोंधळे संचालक इंडो आयरिश हॉस्पिटल,चंपालाल लोढा संचालक मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स लासुर स्टेशन, ऍड राजकुमार अचलिया सहाय्यक विधी अधिकारी मनपा नांदेड, पारस मुथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली, शशिकांत सुतार उपविभागीय अभियंता, पांडुरंग भोसले अध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संतोष गंगाराम भानगडे मॅनेजर सैनिक सहकारी बँक, बाबासाहेब शेकडे अधीक्षक धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर, अमित भाऊ चिंतामणी नगरसेवक जामखेड, डॉक्टर सुरेश काशीद काशीद हॉस्पिटल, विनोद बलदोटा मंत्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा , डॉ. उमेश गांधी अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा, जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय चंद्रकांत चोरडिया हे सर्व उपस्थित राहणार आहेत.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी, समर्थ हाॅस्पीटलचे संचालक डाॅ.भरत दारकुंडे, तेजस कोठारी , सचिन गाडे , प्रफुल्ल सोळंकी, रोहिदास केकान यांच्या सह आणि संजय कोठारी मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सालाबाद प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम तर केले जातातच परंतु बारा महिने त्यांच्या हाताने अपघातातील लोकांचे प्राण वाचवले जातात आणि अनेक समाज उपयोगी विविध कार्यक्रम केले जातात.
सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी होणारे हे शिबीर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेण्याच्या दरम्यान होईल. या शिबिरासाठी येणा-या रूग्णांनी नाव नोंदणीसाठी खालील दुरध्वनीवर संपर्क करावा. सचिन गाडे जामखेड 9156969823