मराठी भाषे सारखी अलंकारिक भाषा जगात दुसरी नाही – न्यायाधीश व्ही व्ही जोशी
ल. ना. होशिंग विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य सादिक शेख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा देऊन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी ए पारखेसर ,प्रमुख पाहुणे मा.श्री.व्ही.व्ही.जोशी साहेब (न्यायाधीश, न्यायालय जामखेड) श्रीमती फंड मॅडम न्यायाधीश, जामखेड तसेच विद्यालयाचे माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग उपस्थित होते.
या प्रसंगी उपमुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने,ओ एस ईश्वर कोळी भाऊसाहेब सर्व प्राध्यापक,अध्यापक उपस्थित होते. विद्यालयातील सेवक हनुमंत वराट हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार श्री.व्ही.व्ही.जोशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात लाभले भाग्य आम्हास हे गीत किशोर कुलकर्णी सर व सुप्रिया घायतडक मॅडम यांनी गायले.या प्रसंगी माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी माझ्या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी भाषा बोलत होते. ती भाषा आम्ही सर्व बोलतो त्यामुळे मला फार मोठे भाग्य लाभले आहे.कवी कुसुमाग्रज त्यांच्या गर्जा जयजयकार क्रांतीचा ही कविता 1942 च्या चले जाओ आंदोलनामध्ये अजरामर झाली.कारण या कवितेने फार मोठी क्रांती घडवली होती.मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे सर्वजन इंग्रजी भाषेचा वापर करीत असले तरी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनामध्ये जास्त वापर केला पाहिजे व जास्तीत जास्त मराठी भाषेला आपण समृद्ध करूया.
संतांनी लोकोध्दारा करिता व समाजोध्दारा करिता काम केले व ते संतपदी पोहोचले सर्वांमुळे मराठी भाषेचा गौरव निश्चित वाढला असून त्याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिकांनी केलेले कार्य ते सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी आहे.म्हणूनच वैज्ञानिक सुद्धा संत आहेत.असे वाटते असे प्रतिपादन केले.
सोपानदेव चौधरी यांचे काव्य गाऊन शेवटी हनुमंत वराट उर्फ तात्या एखाद्याच्या सेवेला किती योग्य न्याय मिळावा या सत्कारासाठी साक्षात न्याय देवता येथे आहे त्यांच्या हस्ते हनुमंत वराट तात्यांचा गौरव होतो या कार्याचा फार महत्त्वाचा भाग आहे तात्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर प्रमुख पाहुणे मा.श्री.व्ही.व्ही.जोशी साहेब न्यायाधीश न्यायालय जामखेड यांनी आपल्या मनोगत मध्ये शासनाने मराठी भाषेला राज्यभाषा दर्जा दिला आहे त्यामुळे आपण मराठी भाषेचा खूप वापर केला पाहिजे.मराठी भाषेसारखी अलंकारिक भाषा जगात दुसरी नाही. मराठी भाषेला एक भावना आहेत.आपल्या सर्वांनाच मराठी भाषेबद्दल गौरव असला पाहिजे दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. न्यायालयात सुद्धा मराठी भाषेचा जास्त वापर होतो. न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार आपण मराठी भाषा किती वापरतो उच्च न्यायालयात आम्हाला दर महिन्याला आढावा द्यावा लागतो न्यायालयाच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन आम्ही न्यायालयाच्या कामकाजात अतिशय व्यस्त असतो पण आज होशिंग विद्यालयातील सुंदर अशा कार्यक्रमास उपस्थित राहता आले.
मन प्रसन्न झाले. त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांचे अभिनंदन केले व आदरणीय श्री हनुमंत वराट यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांनी मनोगत पूर्ण केले. या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला मूलद्रव्य चि.ओम पोले यांने म्हणून दाखवले,संवाद नाटिका, महाराष्ट्रातील लोककला, कोकणगीत,लेझीम,पावरे गीत यावर विद्यार्थ्यांचे नृत्य,ललाटी भंडार विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किशोर कुलकर्णी,सुप्रिया धायतडक, बबनराव राठोड,रोहित घोडेस्वार,संगीता दराडे,साई भोसले,उमाकांत कुलकर्णी, रेश्मा कारंडे,स्वाती बांगर, काळे मॅडम,सुरेखा धुमाळ,जगदाळे मॅडम, स्वप्नाली घाडगे, पूजा भालेराव,प्रभा रासकर, समारंभ प्रमुख आदित्य देशमुख,राऊत मुकुंद,विशाल पोले,स्वप्निल जाधव,हनुमंत वराट,राघवेंद्र धनलगडे, धीरज पाटील त्याचबरोबर सर्व शिक्षकांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे व प्राध्यापिका योगिता भोसले यांनी केले व आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी केले.