सकारात्मक विचारातून यश मिळते – महेश पाटील पोलीस निरीक्षक

0
363

जामखेड न्युज——

सकारात्मक विचारातून यश मिळते – महेश पाटील पोलीस निरीक्षक

 

सकारात्मक विचारातून जीवनात यशस्वी होता येते त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोवळ्या वयात सातत्याने चांगले विचार आत्मसात करावे व आपले जीवन समृद्ध करावे असे प्रतिपादन जामखेडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ व जामखेड महाविद्यालय, जामखेड आणि संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ या उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळेत महेश पाटील बोलत होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डोंगरे एम एल हे होते. विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये सकारात्मकता असल्यास विचारात प्रगल्भता येते त्यामुळे निश्चितपणे आपली यशस्वी वाटचाल होते. 

विद्यार्थी जीवनात महाविद्यालयात प्राप्त झालेले कोणतेही पारितोषिक विद्यार्थ्यांसाठी अनमोल ठेवा असतो व त्याचे मूल्य इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक असते असे मत श्री.पाटील यांनी व्यक्त करून भारतीय न्याय साहितेतील नवीन कायदेविषयक तरतुदी बद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.


अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डोंगरे एम.एल यांनी बदलत्या काळाबरोबर स्वतःला सिद्ध करण्यासाठी चौफेर वाचन, चिंतन आणि मनन करून नव्या आवाहनाचा सामना करावा व आयुष्यात कितीही संकटे आली तरी खचून न जाता जिद्दीने सामोरे जावे असे डॉ डोंगरे म्हणाले.

या कार्यक्रमास एन.सी.सी विभाग प्रमुख डॉ. केळकर, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. गौरव मस्के, श्री ढेरे सह अनेक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी पोलिस दलात नव्याने समावेश झालेल्या महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ . मस्के यांनी केले तर आभार सौ. डॉ गायकवाड ए.ए.यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भाकरे आर.ए यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here