जामखेड बर्फ कारखान्यातील कामगारावर जीवघेणा हल्ला, डोक्यावर 62 टाके

0
3264

जामखेड न्युज——

जामखेड बर्फ कारखान्यातील कामगारावर जीवघेणा हल्ला, डोक्यावर 62 टाके

जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय कामगार असलेल्या विजय ओमप्रकाश चौरासिया याच्या वर जीवघेणा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांवर जामखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपींना जामखेड पोलीसांनी अटक केली आहे. 

या प्रकरणी विजय ओमप्रकाश चौरासिया वय-32 वर्ष धंदा- मजुरी रा. पडरोना जिल्हा कुसीनगर (उत्तरप्रदेश) हल्ली रा. खर्डा रोड महावीर बर्फ कारखाना जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, घरामध्ये वडील ओमप्रकाश,पत्नी कविता, व मुले श्रषभ व प्रिती असे ठिकाणी राहण्यास आहे. मी सुमारे 08 वर्षापासुन दिलीप फुलचंदगांधी रा.जामखेड यांचेकडे त्यांचे महावीर बर्फ कारखान्यामध्ये कामाला आहे.

दिनांक-06/02/2025 रोजी दुपारी 02/00 वा. सुमा. मी एकटा खर्डा रोड येथील महावीर बर्फकारखान्यामध्ये काम करत असताना माझ्या ओळखिचे 1 ) सुरेश आप्पा क्षीरसागर रा. आरोळे वस्ती जामखेड
2 )मनोज सुरेश जगताप रा. म्हाडा कॉलनी जामखेड
3 ) शुभम अमृत पिंपळे रा. आरोळे वस्ती जामखेड असे तिघे महावीर बर्फ कारखाना खर्डा रोड जामखेड येथे आले व काही एक कारण नसताना इसम नामे- 1 ) सुरेश आप्पा क्षीरसागर2) मनोज सुरेश जगताप 3 ) शुभम अमृत पिंपळे यांनी मला शिवीगाळ करुन त्याचे हातातील दगडाने माझे डाव्या पायाच्या नडगीवर व माझे डोक्यात जीवे मारण्याचे उद्देशाने मारहाण करु लागले व त्यातील इसम नामे सुरेश आप्पा क्षीरसागर हे म्हणत होता की याचा पाय तोडा जेणेकरुन हा काम करणार नाही.


कारखाना बंद पडेल असे म्हणून वरिल तिघांनी माझ्या डोक्यास मागील बाजुस व डाव्या पायाचे नडगीवर दगडाने जबर मारहान करुन जखमी केले सदर मारहाणी वेळेस मी मोठमोठयाने ओरडत असल्याने तेथे जवळ असलेले साई ट्रन्सफॉर्म या दुकानातील मॅनेजर महेश कसबे व महावीर बर्फ कारखान्याचे शेजारी राहण्यास असणारे अरुण देवकाते हे तेथे आले असता मला दगडाने मारहाण करणारे तिघे इसम हे त्याचे वरही दगड फेकत तेथुन पळुन गेले.

त्यानंतर महेश कसबे यांनी दिलीप फुलचंद गांधी यांना सदरचा प्रकार सांगितला त्यानंतर माझे मालक हे बर्फे काराखाना येथे आले व मला खाजगी अँम्बुलन्सने उपचारकामी जामखेड येथे खाजगी हॉस्पिटल जामखेड येथे घेवुन आले व मी उपचार घेत असुन सदर मारहाणीत माझ्या डोक्यात मागील बाजुस बासष्ट टाके पडले असुन व माझा डावा पाय नडगीजवळ फ्रेंक्चर झालाआहे. 

तीनही आरोपींना जामखेड पोलीसांनी अटक केली आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवलकर हे करीत आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here