अशोक मोहिते ला मारहाण करणारे वैजनाथ बांगर व अभिषेक सानप या दोघांना कर्नाटकमधून अटक दोघेही कृष्णा आंधळेचे मित्र

0
1711

जामखेड न्युज——

अशोक मोहिते ला मारहाण करणारे वैजनाथ बांगर व अभिषेक सानप या दोघांना कर्नाटकमधून अटक, दोघेही कृष्णा आंधळेचे मित्र

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आणि वाल्मिक कराड संदर्भातील बातम्यांचे व्हिडीओ पाहत असल्याच्या रागातून दोघांनी अशोक मोहिते याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेत अशोक मोहितेच्या डोक्याला आठ टाके पडले होते. अशोक मोहिते गंभीर जखमी झाला होता. तर, मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार झाले होते. धारुर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार केली होती. अखेर आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना अटक करण्यात आली आहे. धारुर पोलिसांनी या दोघांना कर्नाटकमधून अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो म्हणत दोघांनी मोहितेला मारहाण केली होती. सध्या अशोक मोहिते वर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत


अशोक मोहितेवर लातूरमध्ये उपचार

केज तालुक्यातील तरनळी या ठिकाणी होमगार्ड अशोक मोहिते यांना गावातीलच दोन तरुणांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातमी आणि वाल्मिक कराडचे व्हिडिओ पाहत असल्यानं मारहाण केली होती. या घटनेत अशोक मोहितेच्या डोक्याला आठ टाके पडले होते. खबरदारीचा उपाय म्हणून अशोक मोहितेवर लातूरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.


वैजनाथ बांगर अन् अभिषेक सानपकडून कृष्णा आंधळेला शुभेच्छा

आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीला 5 फेब्रुवारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मिस यू भाई म्हणत त्यांनी स्टेटसला कृष्णा आंधळे याचे फोटो ठेवले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर कारवाई करणार असल्याचं देखील म्हटलं होतं.


मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडत नाही. तर दुसरीकडे त्याचं समर्थन करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळे याची दखल पोलीस प्रशासन नेमकी घेते कशी? असा प्रश्न देखील निर्माण झाला होता.


दरम्यान, धारुर पोलिसांनी अशोक मोहिते प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पथकांची स्थापना केली होती. अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांना कर्नाटकातून पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here