धनंजय मुंडेंच्या पावणे तीनशे कोटीच्या घोटाळ्याचा अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे आधीच अडचणीत सापडलेल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांनिशी घोटाळ्यांची मालिका वाचत धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप केले आहेत. केवळ आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सरकारकडे केली आहे.
अंजली दमानिया यांनी आज सकाळी ११ वाजता एक पत्रकार परिषद घेऊन विविध घोटाळ्यांचे पुरावे सादर करत धनंजय मुंडे यांच्यावर एकच हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांच्याकडून पावणे ३०० कोटींचे ५ घोटाळे झाल्याचे म्हणत अजंली दमानियांनी मोठा गौप्यस्फोट केला.
यामध्ये धनंजय मुंडेंनी ९० रुपयांची नॅनो युरियाची बॉटल २२० रूपयांना विकत घेतली
धनंजय मुंडेंनी नॅनो डीएपीची २६१ रूपयांची बॉटल ५९० रूपयांना खरेदी केली १६ मार्च रोजी याचे पैसे दिले आणि ३० मार्चला निविदा काढली.
२ हजार ४५० रूपयांचे फवारणी यंत्र ३ हजार ४२५ रूपयांना घेतलं. २८ मार्च रोजी याचे पैसे दिले आणि ५ एप्रिलला निविदा काढली.
गोगलगायीसाठी वापरलं जाणाऱ्या औषध खरेदीतही धनंजय मुंडेंकडून घोटाळा. ८१७ रूपये प्रतिकिलोचं औषध १ हजार २७५ रूपये प्रतिकिलो दराने खरेदी केलं. १६ मार्च रोजी याचे पैसे दिले आणि ९ एप्रिलला याची निविदा काढली. हे सर्व गैरव्यवहार लपवण्यासाठी बॅक डेटेट पत्रं दिली गेलीत. असा सनसनाटी आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.