दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

0
634

जामखेड न्युज——

दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

नेपाळ मधील काठमांडू शहरात एप्रिल 2025 मध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई टेनिस क्रिकेट चँपियनशिप साठी साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयाचा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी शुभम जालिंदर घोडेस्वार याची निवड झाली आहे. तसे पत्र टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सेक्रेटरी मिनाक्षी गिरी यांनी दिले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूची आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नेपाळ मधील काठमांडू शहरात 10 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 मध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई टेनिस क्रिकेट चँपियनशिप साठी साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयाचा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी शुभम जालिंदर घोडेस्वार याची निवड झाली आहे.
शुभमने नुकत्याच झालेल्या लखनऊ येथील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चार सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या त्याची हीच कामगिरी पाहून टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सेक्रेटरी मिनाक्षी गिरी यांनी त्याची निवड दक्षिण आशियाई टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड केली आहे.

शुभम जालिंदर घोडेस्वार हा जामखेड तालुक्यातील साकत या गावचा रहिवासी व साकेस्वर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना ही जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर तसेच प्रशिक्षक डॉ सुशिल तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी च्या मार्गदर्शनाखाली तो सध्या सराव करत आहे.

शुभम घोडेस्वार याने लखनऊ येथे झालेल्या अंडर नाईन्टीन वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेत चार सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या.

चौकट
शुभम घोडेस्वार हा सध्या डॉ. सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी जामखेड येथे प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शुभमने आपला, शाळेचा, गावचा व क्रिकेट अकॅडमीचा नाव लौकिक वाढवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here