जामखेड तालुक्यातील सुपुत्राचा प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात विशेष सन्मान

0
608

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातील सुपुत्राचा प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात विशेष सन्मान

जामखेड तालुक्यातील सुपुत्राने श्री ज्ञानेश्वर माऊली बहुद्देशीय सेवा भावी संस्था संचालित श्री संत नंद राम महाराज गोशाळा चे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष धोंडिबा सुरवसे याचा गोसांसद म्हणून विशेष सन्मान ज्योतिर्मठ जगतगुरु शंकराचार्य अविमुकत्तेस्वरानंदजी महाराज यांचा अध्यक्षतेखाली करण्यात आला.

तालुक्यातील धामणगावचे सुपुत्र संतोष सुरवसे यांचा गोसांसद म्हणून विशेष सन्मान ज्योतिर्मठजगतगुरु शंकराचार्य अविमुकत्तेस्वरानंद महाराज यांचा अध्यक्षतेखाली करण्यात आला आहे.

संपूर्ण देशात गोहत्त्य बंदी व गोमतेला राष्ट्रमाता हा सन्मान व प्रतिष्ठा मिळवण्याचा उद्दिष्टाने प्रयाग राज उत्तर प्रदेश येथील महाकुंभ मेळाव्यात देशभरातील गौभक्तांनी उपस्थित राहून गोमातेचा सन्मान परम धर्मसंसद मध्ये धर्मादेश काढन्यात आला.

उत्तर प्रदेश प्रयागराज येथे महाकुंभ मेळा दर 12 वर्षाने येतो परंतु हा विशेष महाकुंभ मेळा आहे. कारण हा योग जवळ जवळ 144 वर्षांनी आला आहे त्यामुळे विशेष महाकुंभ मेळात शाही स्नान ह्या पिढीने त्याचा लाभ घेता येईल तो महान पुण्यवान असेल व हिंदू धर्मासाठी ह्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणे ही मोठी पर्वणीच ठरत असते. येथील पवित्र त्रिवेणी संगमावर शाही स्नान केल्यानंतर पाप क्षालन आणि मोक्ष मिळतो म्हणून भाविकांची तेथे मोठी गर्दी उसळते 12 वर्षांनी साधला जाणारा पूर्ण महाकुंभ योग यंदा उत्तर प्रदेश येथे प्रयाग राज येथे गंगा,यमुना आणि सारुस्वती या नदीचा त्रिवेणी संगमावर महकुंभ मेळा शाही स्नान करण्यासाठी देश विदेशातून हिंदू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकत आहेत.

त्या निमित्ताने या त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. प्रयागराज येथे साधूसंत,महंत व हिंदू भाविक मोठ्या संख्येने संख्येने सहभागी होत आहेत, अशा महाकुंभ मेळा यामध्ये गोमातेचे गोसंसाद भरली होती जगतगुरु शंकराचार्य महाराज हे गोमाते ला राष्ट्रमाता दर्जा मिळावा म्हणून विशेष अथक प्रयत्न करत आहेत. त्या अंतर्गत संपूर्ण भारतात गो ध्वज स्थापना व भारत यात्रा काढण्यात आली.
गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा मिळून संपूर्ण देश गोहत्या बंद होण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here