सायकल यात्रेचा समाजातील तरुणांनी आदर्श घ्यावा – सपोनि विजय झंजाड भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आनंद आहे

0
419

 

जामखेड न्युज——–

सायकल यात्रेचा समाजातील तरुणांनी आदर्श घ्यावा – सपोनि विजय झंजाड

भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आनंद आहे

 

भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आनंद आहे हे ब्रीदवाक्य बरोबर घेऊन गेल्या १९ वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सायकल यात्रेचे आयोजन करण्यात येत असून या यात्रे दरम्यान सामाजिक संदेश देत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या यात्रेचा तरूणांनी आदर्श घेऊन सामाजिक कामांबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन खर्डा पो.स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केली आहे.

पिंपळगांव जलाल येथून तुळजापुर, अक्कलकोट, गाणगापुरकडे निघालेली ही यात्रा खर्डा शहरात पोहचल्यानंतर भाजपा नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, संतोष थोरात, नानासाहेब गोपाळघरे, व ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी या यात्रेचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजित देशमुख हे होते. यावेळी नंदकुमार गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश दिंडोरे, राजू मोरे,मा.नगरसेवक अमित जाधव भास्कर गोपाळघरे,बापू ढगे, बंडू चावणे, आकाश खेडकर, महारुद्र हुंबे, राठोड सर, खामकर सर, गणेश नेहरकर, धनसिंग साळुंखे इत्यादी उपस्थित होते.

पुढे बोलताना विजय झंजाड म्हणाले की, सायकल चालवल्याने शरीराला व्यायाम होतो तसेच या सायकल यात्रेच्या माध्यमातून समाज जनजागृती होत असते तसेच प्रत्येकाने संकटावर मात करून आत्महत्या करण्याचे टाळावे व या सायकल यात्रेचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

यावेळी बोलताना प्रा. मधुकर आबा राळेभात म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सलग १९ व्या वर्षी ही सायकल यात्रा गाणगापुरच्या दिशेने चाललेली आहे, या सायकल यात्रेदरम्यान दरवर्षी सामाजिक, राष्ट्रीय, शैक्षणिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या या रॅलीमध्ये नायलॉन मांजा आणि कायदेविषयक प्रबोधन करण्यात येत आहे.५६०किलोमीटरची ही यात्रा निघाल्यापासून सहाव्या दिवशी गाणगापुर येथे पोहचणार असून या सर्वांचा प्रवास सुखकर होवो असे प्रा. राळेभात म्हणाले.

यंदाच्या सायकल यात्रेमध्ये तीस सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात एक पुरूष व एक महिला न्यायाधिश यांचाही समावेश आहे. ७८ आणि ६८ वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिका व इतर दोन महिलांचाही समावेश आहे.

यात्रेदरम्यान कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराबरोबरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणे, ठिकठिकाणी वृक्षारोपण करून सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, संक्रांतीनिमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करणे कायद्याने गुन्हा असून त्याचा वापर टाळावा. जेणेकरून कोणत्याही मनुष्य अुवा पशु-पक्षांची हाणी होणार नाही यासंबंधी जनजागृती फलक सायकलला लाऊन प्रबोधन करण्यात येत आहे.
या यात्रेत न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, न्यायाधीश डॉ. संगीता आव्हाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भोरकडे, गणेश भोरकडे, नवनाथ भोरकडे, किशोर खोकले, रोहित पाटील, विशाल खोकले, बाळासाहेब बनकर, गणेश मोरे, युवराज गांगवे, साईनाथ गायकवाड, प्रदीप हांडोरे, नितीन कोकाटे, गोरख घोटेकर, सुमेधा अभंग, मनिषा खोकले आदी सहभागी झाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील गोलेकर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी मानले.
चौकट
लक्षवेधी फलक घेत आहे लक्ष वेधून

भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आनंद आहे खरा, विधी सेवा प्राधिकरण जिथे, तीथे अन्यायाला वाचा फोडे, साधता संवाद संपतील वाद, न्याय सबके लिये समान है आदी फलकही लक्ष वेधून घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here