जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जामखेड तालुक्यातील आठ विद्यार्थी चमकले हस्ताक्षर स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सरल बोराटे व सम्राट घोडेस्वार प्रथम तर गोष्ट सादरीकरणात अक्षरा वारे प्रथम
जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जामखेड तालुक्यातील आठ विद्यार्थी चमकले
हस्ताक्षर स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सरल बोराटे व सम्राट घोडेस्वार प्रथम तर गोष्ट सादरीकरणात अक्षरा वारे प्रथम
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर तर्फे नुकत्याच विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात जामखेड तालुक्यातील स्पर्धकांनी आठ स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करत क्रमांक पटकावले आहेत.
यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गोष्ट कथा सादरीकरण, वेशभूषा सादरीकरण, वैयक्तिक गीत गायन, समुह गीत गायन अशा विविध स्पर्धेत किलबिल गट, बालगट, किशोर गट, कुमार गट असे गट करण्यात आले होते यात वेगवेगळ्या स्पर्धेत जामखेड जिल्हा परिषद शाळेतील आठ चिमुकल्यांनी आपली चमकदार कामगिरी करत क्रमांक पटकावले.
प्रथम क्रमांक हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथील सरल लहू बोराटे प्रथम क्रमांक तसेच किशोर गटात जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथील सम्राट अशोक घोडेस्वार याने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला तर गोष्ट सादरीकरण मध्ये जिल्हा परिषद शाळा बांधखडक येथील अक्षरा अमोल वारे हिने प्रथम क्रमांक पटकावला
द्वितीय क्रमांक वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत बालगटात जिल्हा परिषद शाळा गुरेवाडी येथील योगिता अशोक कोरडे द्वितीय तसेच किशोर गटात जिल्हा परिषद शाळा सारोळा येथील पृथ्वीराज भरत काशिद द्वितीय क्रमांक पटकावला
तृतीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धेत बालगटात जिल्हा परिषद शाळा लोणी येथील अलमिरा अकबर शेख तृतीय तर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत किलबिल गटात जिल्हा परिषद शाळा गुरेवाडी येथील हर्ष पोपट कोरडे तर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत कुमार गटात जिल्हा परिषद शाळा सारोळा येथील महेश बाबासाहेब काशिद यांनी तृतीय क्रमांक पटकावले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक, पालक व मित्रमंडळी यांच्या कडून करण्यात येत आहे.