जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर दिवसाढवळ्या दरोडा वजनात तफावत लिलावात जास्त भाव पट्टी मात्र कमी 

0
83

जामखेड न्युज——–

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर दिवसाढवळ्या दरोडा

वजनात तफावत लिलावात जास्त भाव पट्टी मात्र कमी 

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी एकाच लिलावात विकल्या गेलेल्या अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशोबात घोळ झाल्याचे उघड झाले आहे. कोणाचे वजन कमी लिहले तर कोणाचे बिल लिलाव झालेल्या भावापेक्षा कमी दराने बनवले, शेतकऱ्यांच्या साधेपणाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार,जागृत शेतकऱ्यांमुळे सगळा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जामखेड तालुक्यातील तसेच शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीसाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजारपेठ असल्याने आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी जामखेड बाजारपेठेलाच प्राधान्य देतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड येथे येत असतो.

पण काही व्यापाऱ्यांकडुन शेतकऱ्यांसोबत धोका झाल्याने जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी शेतकऱ्यांच्या मनात संशय निर्माण होत आहे. काल झालेल्या लिलावात वंजारवाडी येथील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विक्रीसाठी आणला असता अलंकार ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे कांदा विक्रीसाठी ठेवला असता एका शेतकऱ्याच्या कांदा गोण्याच्या वजनात गडबड करून ५०/५५ किलो वजन कमी केले,तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याचा निलाव ३१ रूपये प्रती किलोने झाला असता २१ रू प्रती किलोने शेतकऱ्याला पमेंट दिले, अजुन एका शेतकऱ्याच्या कांद्याचा निलाव २४ रूपये प्रती किलोने झाल्यानंतरही त्या शेतकऱ्याच्याही फसवणुक करत २१ रूपये किलोने बील दिले शेतकऱ्यांना संशय आल्यानंतर सर्व बिलं चेक केले असता १० ते १२ हजार रूपयाचा फरक शेतकऱ्यांच्या हिशोबात आढळुन आला. यामुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

एकाच दिवशी एकाच वेळी ३/४ शेतकऱ्यांच्या बिलामध्ये चुक होणं ही चुकभुल नसुन ही शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक केलेली फसवणुक आहे. याअगोदरही अनेकवेळा फसवणुक झाली असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. आम्ही अलंकार ट्रेडर्स या व्यापाऱ्यावर विश्वास ठेवून चुक झाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी महादेव ओंबासे या शेतकऱ्याने दिली.अलंकार ट्रेडर्स याठीकाणी यापुर्वी कांदा विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपले बिल तपासण्याचं आवाहनही यावेळी शेतकऱ्यांकडुन करण्यात आलं आहे.


यापुर्वीही अशाप्रकारे आमची फसवणुक झाली असली तरी भविष्यात कुठल्या शेतकऱ्यांची फसवणुक होऊ नये म्हणुन आम्ही व्यापाऱ्यावर रीतसर गुन्हा दाखल करणार असल्याचही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

मोठ्या विश्वासाने शेतकरी शेतमाल जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड येथे आणत असतात यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणुक होणं ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या कष्टावर असा दिवसाढवळ्या दरोडा टाकणं हा खुप मोठा अन्याय जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्यांकडुन होत आहे.

शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत शेतकऱ्यांची फसवणुक करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही कांदा खरेदी करताना कांदा प्रतवारीत पुणे,नगर याठीकाणी सरासरी एक नं प्रतवारी आणि दोन नं प्रतवारी यामध्ये ४/५ रुपयाचा फरक असतो पण जामखेड येथे हाच फरक व्यापाऱ्यांकडुन १०/१२ रुपयाचा केला जातो शेतकऱ्याने आणलेला अर्धा माल रास्त बाजारभावात घेतला जातो आणि अर्धा अत्यंत कमी दरानेघेतात,अर्धा माल परत घेऊन जाणे शक्य होत नसल्याने तो मालही नाविलाजाने शेतकऱ्यांना ठेवुन जावं लागते,अनेक वेळेस विक्रीसाठी आणलेला कांदा रीतसर भाव न दिल्याने शेतकऱ्यांनी परत घेऊन जात नगर,पुणे येथे चांगल्या दराने विकल्याच्याही घटना घडल्या आहेत,
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सर्वच निलाव प्रक्रिया याप्रकारामुळे संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

हा प्रकार फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतचं घडतोय का इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतही घडतोय याची चौकशी होणे गरजचं असुन शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या होणारी फसवणुक थांबायला हवी.

चौकट
वडिलांनी दि. ७ रोजी कांदा विक्री साठी आणला होता. वजन तफावत तसेच एका दराने लिलाव झालेला असताना कमी दराने पैसे दिले वडील अशिक्षित असल्याने काही लक्षात आले नाही आज आम्ही परत काही शेतकऱ्यांना परत हाच अनुभव आला यामुळे मुद्दामच शेतकऱ्यांना फसवले जात आहे. याबाबत रितसर तक्रार पोलीस स्टेशनला करणार आहोत.

महादेव ओंबासे शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here