राजुरीच्या सरपंच अश्विनी सागर कोल्हे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
नीलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पारनेर येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी ९ वाजता विशेष कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या सोहळ्यास खासदार नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी विविध तज्ज्ञ समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. समित्यांनी प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांची छाननी करून अंतिम यादी जाहीर केली आहे.
ग्रामीण भागातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणे व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान करणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.
विविध क्षेत्रांतील पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे आहेत
सामाजिक कार्य :
डॉ. गिरीष कुलकर्णी (अहिल्यानगर), अभिषेक राजेंद्र दंडनाईक (श्रीगोंदा), तुकाराम बबन वाखारे (पानोली, ता. पारनेर), हरिहर गर्जे (पाथर्डी), बाळासाहेब नारायण चौधरी (अमरापूर, ता. शेवगाव).