अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सल्लागार मंडळावर प्रा. डाॅ. टी. एम. वराट यांची निवड

0
361
जामखेड प्रतिनिधी
            जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट) 
   अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सल्लागार मंडळावर प्रा. डाॅ. तुकाराम माणिकराव वराट यांची निवड झाल्याबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     प्रा. डाॅ. टी. एम. वराट यांनी संस्थेच्या न्यू आर्टस् काॅलेज मध्ये भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून ३७ वर्षे सेवा केली.  पंधरा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर होते तसेच त्यांनी भूगोल विभाग प्रमुख व उपप्राचार्य म्हणूनही काम पाहिले होते. महाविद्यालयाच्या नॅक कमिटीमध्ये समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच त्यांची भूगोल विषयाचे १७ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल संस्थेने त्यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here