जामखेड येथील प्रसिद्ध कवी व लेखक आ. य. पवार वय 78 यांचे आज 5.05 वाजता निधन झाले त्यांचा अंत्यविधी रात्री ठिक 8.30 वाजता तपनेश्वर येथील अमरधाम येथे होईल. मराठा आंदोलनातील प्रमुख अवधूत पवार यांचे ते वडील होत.
प्रा.आ.य.पवार हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा दोन मली (विवाहित), सुन, नातवंडे असा परिवार आहे.
प्रा.आ.य.पवार यांच्या विज्ञान कविता व काव्यसंग्रह राज्य व राज्याबाहेरील विविध विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रमाला आहेतआ.य.पवार यांच्या विज्ञान कविता नांदेड, नागपूर, अमरावती व मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात आहेत.
तसेच त्यांचा ‘धूळपेर’ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाला शंभर गुणासाठी आहे. ‘धूळपेर’ काव्य संग्रहाला कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रस्तावना आहे.शेतकरी जीवन, महिला जीवन, सामाजिक, राजकिय व विज्ञान आणि निसर्ग विषयावरील कविता असल्याने हा काव्य संग्रह सामीक्षकांनी गौरविलेला आहे.
पवारांची कविता स्वतंत्र वळणाची व छंदोबद्ध आहेत. जामखेड येथे मराठी साहित्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून कवी संमेलन तसेच विविध कार्यक्रम घेण्यात ते नेहमी आघाडीवर असत.