चित्रकलेच्या प्रसारासह कला साक्षरताही आवश्यक – रामदास फुटाणे ग्रामीण भागातील कलाकार शहरात प्रदर्शन भरवतात हा जिल्ह्याचा अभिमान – पोपटराव पवार मुकुंद राऊत यांचे बालगंधर्व येथे मॉडर्न आर्ट चित्र शिल्प प्रदर्शन संपन्न

0
484

जामखेड न्युज——

चित्रकलेच्या प्रसारासह कला साक्षरताही आवश्यक
– रामदास फुटाणे

ग्रामीण भागातील कलाकार शहरात प्रदर्शन भरवतात हा जिल्ह्याचा अभिमान – पोपटराव पवार

मुकुंद राऊत यांचे बालगंधर्व येथे मॉडर्न आर्ट चित्र शिल्प प्रदर्शन संपन्न

चित्रकला ही प्राचीन काळापासून,मानवाची संवाद भाषा असून आजच्या मोबाईल युगात कलेचा प्रसार झपाट्याने होताना दिसतो आहे. परंतू कला रसिकांसह सामान्य नागरिकांमध्ये कला साक्षरता होणे सुद्धा गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ कवी, कला समिक्षक व सिने दिग्दर्शक श्री रामदास फुटाणे यांनी केले. बालगंधर्व कलादालन पूणे, येथे आयोजित जामखेड येथिल कलाशिक्षक मुकुंद राऊत यांच्या मॉडर्न आर्ट (abstract पेटिंग) विषयक चित्र शिल्प प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्‌मश्री पोपटराव पवार, आदर्श गाव समिती अध्यक्ष, महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कला शिल्पकार प्रमोद कांबळे, याच्यासह . अ ल देशमुख, सदानंद होशिंग, प्राचार्य बाळासाहेब पारखे, लहू काळे, संजय पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते,याप्रसंगी, मान्यवरांनी राऊत यांच्या चित्रकला प्रसाराबाबत विशेष कौतुक करत सदिच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकत मुकुंद राऊत यांनी कलाजीवनाचा प्रवास उलगडत ल. ना. होशिंग विदयालय जामखेड यांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद व संचालक मंडळ यासह माजी विद्यार्थी याचे आभार मानले.

यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, ग्रामीण भागातील कलाकार शहरात येऊन प्रदर्शन भरवतो ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच आई वडीलांचा सत्कार करतात याबद्दल मुकुंद राऊत यांचे कौतुक केले. व मनाला आनंद वाटला असे सांगितले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने राऊत यांचे आईवडील घनश्याम व शांताबाई राऊत यांचा मान्यवरांच्या शुभहस्तते नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे तर आभार डॉ प्रवीण बनकर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here