जामखेड महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा अवी बेलेकर यांचा इशारा
जामखेड शहरातील नगर रोड परिसरातील कोठारी पेट्रोल पंप शेजारील ट्रान्सफॉर्मर वर प्रमाणापेक्षा जास्त लोड यामुळे व्यापारी व नागरिकांना सतत लाईट फाँल्ट, प्युज जाणे, डीम लाईट यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना सांगूनही फरक पडत नाही यामुळे आठ दिवसांत कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेले पाच वर्षे झालं कोठारी पंप शेजारची डीपी खराब आहे वाढतं औद्योगिकीकरण व नागरिकरण त्याच्यामुळे त्या डीपीवर लोड भरपूर झालेला आहे तरीपण महावितरण लक्ष देत नाही वारंवार तक्रारी करून वारंवार अर्ज करून वारंवार त्यांना सांगून महावितरण नगर रोडला लक्ष देत नाही महिन्यातून पंधरा दिवस लाईट डिम असते पंधरा दिवस कसतरी असते.
डिसेंबर महिन्यात तर तीन दिवस पोल पडले म्हणून लाईट नव्हती तीन दिवस तारा तुटल्या म्हणून लाईट नव्हती आणि आत्ता आठ दिवस झाले साधा बल्ब सुद्धा लागत नाही. अशी अवस्था आहे.
नगर रोड वरील व्यापारी लोकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले तर मनावर घेत नाही जर या डीपीचे लवकरात लवकर काम नाही झाले तर भाजपाचे नेते संजय काशीद यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जगदंबा कुशन अवि दादा बेलेकर, अरुण शेठ निमोकर, राजाभाऊ पोकळे, सांगळे ऑटोमोबाईल्स, बापू मोटार गॅरेज, अंबिका वेल्डिंग वर्क, संतोष पोटफोडे, चंदन जिम, समीर चंदन, जमीर सय्यद, बाबू टिळेकर यांच्या सह अनेक नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
वायरमेन लोकांना फोन केला तर वारंवार उडवा उडवी चे उत्तर देतेत आम्ही काय करणार डीपीच खराब आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करा वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तर वरिष्ठ अधिकारी म्हणतात की आम्ही नाशिकला आहोत अर्ज केला आहे तुम्ही तुम्हाला नवीन डीपी बसून देऊ पण पाच वर्षापासून डीपीचा घोटाळा दुरूस्त झालेला नाही. यामुळे आम्ही आठ दिवसात ट्रान्सफॉर्मर दुरूस्त न झाल्यास आंदोलन करणार असे सांगितले.