जामखेड मध्ये बॅनर वरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने , जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाविरोधात सभापती राम शिंदे यांची भव्य मिरवणूक

0
4199

जामखेड न्युज——

जामखेड मध्ये बॅनर वरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने , जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाविरोधात सभापती राम शिंदे यांची भव्य मिरवणूक

जामखेड शहरातील खर्डा चौकात आ. रोहीत पवार यांचे २५ फुट उंचीचे कट आऊट काढण्यावरून शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. तीन तास चाललेल्या या गोंधळामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. अखेर तीन तासानंतर प्रशासनाने आ. रोहीत पवार यांचा कटआऊट काढला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आंदोलनाचा इशारा दिला आहे तर भाजप कार्यकर्त्यांनी आम्ही रितसर अर्ज देऊन परवानगी घेतल्यामुळे आम्ही विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा कटआऊट लावणाराच असा आग्रह धरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर नियमानुसार प्रशासनाने भाजपला परवानगी दिली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रा राम शिंदे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला तर रोहित पवार यांचा विजय झाला सध्या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सोशल मीडियावर मतदारसंघात मोठे वाँर सुरू आहे यातच उद्या विधानपरिषदेचे सभापती आमदार प्रा राम शिंदे यांचा नागरी सत्कार व भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावरून मतदारसंघात बँनर वाँर सुरू झाले आहे. शनिवारी संध्याकाळी दोन्ही
पक्षाकडून मोठ्या प्रमाणात बँनर वाँर सुरू होते.

सुमारे तीन तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते जामखेड शहरात आमनेसामने होते. मोठ्या प्रमाणात वाहतूक रहदारी निर्माण झाली होती.

भाजपा कडून सत्तेचा दुरुपयोग – राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर
सत्तेचा वापर करत आमदार रोहित पवार यांचा बँनर प्रशासनाने काढला आहे. आम्ही वाढीव मुदतीचे आँनलाईन पैसे भरले आहेत. तरीही प्रशासनाने परवानगी दिली नाही. प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या मतानुसार चालत आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश असताना सभापती राम शिंदे यांची मिरवणूक होत आहे. राम शिंदे यांचे संविधानिक पद आहे नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस निरीक्षक एकतर्फी काम करत आहेत.
राम शिंदे यांचे शेकडो बोर्ड आहेत. रोहित पवार यांचे एक बँनर जमत नाही. या प्रशासनाच्या एकाधिकार शाही विरोधात तीव्र आंदोलन करणार.
विजयसिंह गोलेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष

तालुकाला मोठे पद म्हणून नागरी सत्कार व मिरवणूक – सभापती शरद कार्ले
आम्ही परवानगी साठी 24 डिसेंबर रोजी अर्ज केला होता राष्ट्रवादी काँग्रेस ची परवानगी 27 पर्यंत होती
तरीही हट्ट धरलेला आहे. त्यांचे आँनलाईन चलन स्विकारले नाही. तालुक्याला सर्वात मोठे पद मिळाले आहे. त्यामुळे नागरी सत्कार व सर्व पक्षीय सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे सत्कार करणे आपले कर्तव्य आहे.
शरद कार्ले – सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड
पोलीस निरीक्षक महेश पाटील.
जमावबंदी 365 दिवस असते. पंधरा दिवसांनी त्यात बदल होत असतो. जिल्हाधिकारी यांचा संचारबंदी आदेश असला तरी मिरवणूक परवानगी देता येते यानुसार उद्याच्या मिरवणुकीस परवानगी दिली आहे. सचारबंदी आदेश लागू असताना देता येत नाही जमवंबंदी आदेश हे माननीय जिल्हाधिकारी प्रत्येक पंधरा दिवसासाठी काढतात365 दिवस चालूच असतात
– पोलीस निरीक्षक महेश पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here