श्री साकेश्वर विद्यालयाचा खेळाडू शुभम घोडेस्वार याची लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयाचा खेळाडू शुभम घोडेस्वार याची निवड राज्याच्या संघात झाली असून तो लखनौ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाला.
जामखेड तालुक्यातील साकत या गावचा रहिवासी व साकेस्वर विद्यालय चा विद्यार्थी शुभम घोडेस्वार याची लखनऊ येथे होणाऱ्या अंडर नाईन्टीन वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.
28 ते 30 डिसेंबर यादरम्यान लखनऊ येथे उत्तर प्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेटमध्ये मोठे स्टेज मिळावे व अनुभव मिळवा यासाठी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया दरवर्षी विविध स्पर्धेचे आयोजन भारताच्या वेगवेगळ्या राज्यात करत असते.
या संघटनेने शालेय खेळांमध्ये टेनिस क्रिकेट प्रकाराचा समावेश केला आहे. तालुकास्तर जिल्हास्तर व राज्यस्तर तसेच देशस्तर शालेय स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या होत असतात. याचा फायदा खेळाडूंना नोकरीमध्ये होत आहे.
तसेच असोसिएशन समांतर स्पर्धा अनुभवासाठी ही आयोजित करते. राष्ट्रीय स्पर्धा या लखनऊ येथे आयोजित करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेचे आयोजन टेनिस क्रिकेटच्या राष्ट्रीय सचिव माननीय मीनाक्षी गिरी, भारतीय टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष कन्हैयालाल गुजर, तथा उत्तर प्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशन यांनी केले आहे.
चौकट शुभम घोडेस्वार हा सध्या डॉ. सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी जामखेड येथे प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शुभमने आपला, शाळेचा, गावचा व क्रिकेट अकॅडमीचा नाव लौकिक वाढवला आहे.