अहिल्यानगर जिल्ह्यात युवकाच्या शरिराचे बिबट्याने तोडले लचके, युवक ठार

0
3432

जामखेड न्युज——

अहिल्यानगर जिल्ह्यात युवकाच्या शरिराचे बिबट्याने तोडले लचके, युवक ठार

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामनाथ सूर्यभान गुरुकुले ( रा.सावरगाव तळ ) असे मयत युवकाचे नाव आहे. गुरुकुले यांच्या छातीपासून डोक्यापर्यंतचा सर्व भाग लचके तोडत बिबट्याने खाऊन टाकला. संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मानवी बळी जाण्याची या वर्षातली ही चौथी घटना ठरली.

ही घटना रविवारी (दि.२२) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास समोर आली. वनविभागाच्या हद्दीत संगमनेरातील हिवरगाव पावसा शिवारात रामनाथ सूर्यभान गुरुकुले (वय ३४, रा.सावरगाव तळ) यांचा मृतदेह आढळून आला.

बिबट्याने त्यांना ओढत जंगलात नेले, त्यांच्या शरीरावरीलअनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळून
आल्या आहेत.

मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊन अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला. हे स्पष्ट होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संगमनेर भाग १चे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे देखील तेथे पोहोचले.पोलिस काही अंतर पुढे जाऊन पाहत असताना गवताला, दगडांना रक्ताचेडाग लागलेले दिसले. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत एकाचा मृतदेह त्यांना आढळून आला.

शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या. बिबट्या च्या हल्यात मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी पंचनामा केला आहे व हा मृतदेह रामनाथ सूर्यभान गुरुकुले ( रा.सावरगाव तळ ) यांचा असल्याची खात्री पटली आहे.
गणेश दादाभाऊ शिरतार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here