जामखेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान
विविध मान्यवरांकडून अभिनंदन
जामखेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर यांना आज अहिल्यानगर येथे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन विविध क्षेत्रातून होत आहे.
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दशरथ कोपनर यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दशरथ कोपनर यांनी 1997 मध्ये चन्नापा माध्यमिक विद्यालय पिंपळगाव उंडा येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आता ते आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयफक्राबाद येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या मुख्याध्यापक व प्राचार्य पदाच्या काळात शालेय शिस्त, वृक्षारोपण, तसेच अनेक खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत याच कामाची दखल घेत मुख्याध्यापक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे.
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल शारदा शिक्षण प्रसारक मंडळ संगमनेर संस्थेचे संस्थापक सचिव आर. जी. गाडेकर, अध्यक्ष सुलोचना गाडेकर, चेअरमन प्रविण गाडेकर, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष तथा सरपंच विश्वनाथ राऊत,गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी खताळ, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. ए. पारखे, प्रा. रमेश अडसूळ, प्रा. आप्पा शिरसाठ, दत्ता काळे, शंकर खताळ, रमेश चौधरी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी गायकवाड, भरत लहाने, अनिल देडे, भाऊसाहेब इथापे, संघटनेचे नेते एकनाथ चव्हाण, मुकुंद सातपुते, तसेच लिपिक संघटनेचे आदरणीय ईश्वर कोळी, विजय गव्हाणे, विजय हराळे, धनवडे भाऊसाहेब तसेच आणखिरीदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.