तालुक्यातील मोहा येथील युवक सोनू बेलेकर वय 29 या युवकांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यामुळे जामखेड व मोहा परिसरात शोककळा पसरली आहे.
सोनू बेलेकर यांचे जुन्या बस स्थानकासमोर मेडिकल दुकान आहे तर मोठ्या बंधुचे डॉ. भवर यांच्या हाँस्पीटल जवळ मेडिकल दुकान आहे. दुपारी छातीत दुखू लागले तेव्हा त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांच्या निधनाने जामखेड, मोहा परिसरात शोककळा पसरली आहे.
सोनू बेलेकर यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.
सोनू बेलेकर यांच्या मागे आई वडील, एक भाऊ, पत्नी व एक तीन वर्षांची मुलगी आहे.