श्री दत्त जन्म सोहळयानिमित्त हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये अखंड हरिनाम सोहळयास प्रारंभ. किर्तनसेवेचा लाभ घेण्याचे दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांचे आवाहन.
श्री दत्त जन्म सोहळयानिमित्त हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये अखंड हरिनाम सोहळयास प्रारंभ.
किर्तनसेवेचा लाभ घेण्याचे दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांचे आवाहन.
श्री दत्त जयंतीनिमित्त तालुक्यातील हाळगाव येथील तिर्थक्षेत्र सिध्देश्वर दत्त संस्थानामध्ये रविवारपासून (ता.८) श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.सिध्देश्वर दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह रामायणाचार्य बाबा महाराज ढवळे यांच्या प्रेरणेने होत आहे.तर निरा-नरसिंहपुर अंकुश महाराज रणखांबे व्यासपीठ चालक असुन,त्यांचे सात दिवस संतचरित्र होणार आहे.
८ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, संतचरित्र, हरिपाठ,हरिकिर्तन व नंतर हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम आहे.
या सप्ताहात गायनाचार्य संजय महाराज सायकर, गायनाचार्य माऊली महाराज म्हस्के,गायनाचार्य गणेश महाराज धुमाळ,गायनाचार्य श्यामसुंदर महाराज ढवळे, भागवताचार्य मनोहर महाराज शिनारे, वेदांताचार्य केशव महाराज मुळीक, रामायणाचार्य विष्णु महाराज मिरधे यांची किर्तनसेवा होणार आहे.
दरम्यान दत्त जन्म सोहळयानिमित्त शनिवारी (ता.१४) सायंकाळी पाच वाजता अंकुश महाराज रणखांबे यांचे किर्तन होणार आहे. तर रविवारी (१५) सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान दिंडी सोहळा प्रदक्षिणा होवून, दिनानाथ महाराज सावंत यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
या सप्ताहात कोर्टी (ता.करमाळा) येथील श्री संत हरि हरि बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकरी हरिपाठ आणि किर्तनासाठी साथ संगत करणार आहेत. या सप्ताहानिमित्त होणा-या किर्तनसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त संस्थानचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा हरीनाम सप्ताह
हाळगावचा सिध्देश्वर दत्त संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणार हरिनाम सप्ताह हा जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा सप्ताह मानला जातो. राज्यभरातील हजारो भाविक सप्ताहात सहभागी होत असतात. भाविकांचा उदंड प्रतिसाद आणि सप्ताहाची शिस्तबध्द परंपरा गेली ३७ वर्ष जोपासली जात आहे.