सुमारे आठ वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील पीडितेवर अत्याचार करून निर्घृण खुन करण्यात आला होता. यावरून राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकेचे धनी झाले होते.
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली यामुळे एक वेगळा संदेश दिला आहे. अहिल्यानगर पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाकळीहाजी या गावात विवाह सोहळा संपन्न झाला यास खास आवर्जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह अनेक भाजपा नेत्यांनी हजेरी लावली होती.
दिलेल्या शब्दाला जागणारे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
कोपर्डीत ८ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता.
काल तो दिवस उगवला आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा.
या विवाह प्रसंगी आमदार प्रा. राम शिंदे , प्रवीण दरेकर, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.